Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : अभिनेत्रीकडून बॉलिवूडची काळी बाजू उघड, जाणून घ्या काय म्हणाली...

अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली.

  धक्कादायक : अभिनेत्रीकडून बॉलिवूडची काळी बाजू उघड, जाणून घ्या काय म्हणाली...

मुंबई : ईशा कोप्पीकरने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. ही गोष्ट वेगळी की, तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास जादू दाखवू शकले नाहीत. अशा परिस्थितीत अभिनेत्री पडद्यापासून दूर गेली. मात्र ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यादरम्यान तिने एका मुलाखतींमध्ये तिचे मागचे दिवस आठवून इंडस्ट्रीतील अडचणींबद्दल सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने बॉलीवूडच्या चकाकीमागील काळं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःशी संबंधित एका घटनेचा संदर्भ देत, अभिनेत्रीने सांगितलं  की, अभिनेत्याशी गुप्त भेट न केल्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. या घटनेचा तिने यापूर्वीही उल्लेख केला आहे. पण नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा त्या घटनेला कात्री लावली आणि ईशा म्हणाली, 'मी पूर्णपणे तुटलेले आणि निराश झाले होते.

कारण, येथे तुमचं काम आणि तुमचा लूक महत्त्वाचा आहे असं मला वाटायचं. पण सत्य परिस्थिती तशी नाही… तुम्ही अभिनेत्याच्या गुडबूकमध्ये आहात की नाही हे महत्त्वाचं आहे आणि अभिनेत्याच्या गुडबूकचा अर्थ असा आहे. मला वाटतं की आपल्या सर्वांचं स्वतःचं प्राधान्य आहे आणि माझ्यासाठी माझं प्राधान्य माझं जीवन आहे. जे माझ्या कामापेक्षा मोठे आहे. 

fallbacks

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं की, एका बॉलिवूड अभिनेत्याला तिच्या स्टाफशिवाय तिला एकांतात भेटायचं होतं. कारण तिला हिरोच्या गुड बुक्समध्ये यावं लागेल असं तिला सांगण्यात आलं होतं. ईशाच्या म्हणण्यानुसार, तिने अभिनेत्याची ऑफर नाकारली, परिणामी तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आलं.

Read More