Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची होणार चौकशी

अभिनेता जॅकी श्रॉफ याची बायको आयशा श्रॉफ ठाणे क्राईम ब्रांचच्या रडारवर आलेय. सीआरडीसंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची होणार चौकशी

ठाणे : अभिनेता जॅकी श्रॉफ याची बायको आयशा श्रॉफ ठाणे क्राईम ब्रांचच्या रडारवर आलेय. सीआरडीसंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

साहिल खान याची सीडिआर

आयशा श्रॉफ हिने साहिल खान याची सीडिआर काढून वकील रिझवान सिद्दीकी याला दिल्याची माहीती समोर आलेय. आयशा श्रॉफ हिची उद्या क्राईम ब्रांच कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. सीडीआर रिझवान सिद्दीकी खटल्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे.

ऋतिकचा नंबर रिझवानला एसएमएस

 दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत हीने ऋतिक रोशनचा फोन नंबर रिझवानला एसएमएस केला होता. आता तो नंबर कशासाठी दिला होता, याचीही ठाणे गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. 

Read More