Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशा अंबानीनंतर 'या' व्यक्तीचं गुपचूप लग्न

बॉलिवूडशी हे आहे कनेक्शन 

ईशा अंबानीनंतर 'या' व्यक्तीचं गुपचूप लग्न

मुंबई : सध्या आता सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. 12 डिसेंबर रोजी ईशा मुकेश अंबानीचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर अजूनही 2018 मध्ये लग्नबेडीत लोकं अडकत आहे. आता आणखी एका लग्नाची माहिती समोर आली आहे. हे लग्न गुपचूप पद्धतीने करण्यात आलं. 

लोकप्रिय निर्माता दिनेश विजानने प्रमिता तंवरसोबत लग्नगाठ बांधली आहे. हे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने पार पाडलं गेलं. या लग्नाला कुटुंबातील मंडळी आणि अतिशय जवळचे मित्रपरिवार होते. 

दिनेश विजान खूप दिवसांपासून प्रतिमाला डेट करत होते. अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रतिमा ही दुबईतील बेस्ट रिअल स्टेट एजंट आहे. त्यामुळे हे लग्न थोडं वेगळं आहे. 

या शाही सोहळ्याला दिनेश यांनी निळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर प्रतिमा गुलाबी रंगाच्या लेहंग्यात दिसली. या सिक्रेट लग्नात बॉलिवूडची काही मंडळी उपस्थित होती. यामध्ये रवीना टंडन आपला नवरा अनिल थडानीसोबत उपस्थित होती. 

त्याचप्रमाणे वरूण धवन, श्रद्धा कपूर, कृती सेनन देखील होते. दिनेश विजान यांनी आतापर्यंत लव आज कल, कॉकटेल, बदलापुर, हिंदी मीडियम सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. 

यासोबत आणखी 3 सिनेमे 2019 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमांत अर्जुन पटियाला, मेड इन चायना आणि लुका छिपीचा सहभाग आहे. लुका छिपी सिनेमात कार्तिक आर्यन, कृति सेननची मुख्य भूमिका आहे. तसेच लक्ष्मण उतेकर हा सिनेमा दिग्दर्शित देखील करत आहे. 

या 2 दिवसात बॉलीवुड आणि टेलीव्हिजनमध्ये जवळपास 6 व्यक्ती लग्नबेडीत अडकले आहेत. यामध्ये ईशा अंबानीसोबतच कपिल शर्मा, पारुल चौहान, रघु राम, अदिति गुप्ता आणि आता  दिनेश विजानच्या नावाचा सहभाग आहे. 

Read More