Marathi News> मनोरंजन
Advertisement

‘खाना खजाना’ फेम सेलिब्रिटी शेफ Sanjeev Kapoor, लेकिच्या लग्नात भावूक; सोशल मीडियावर Photo Viral

Sanjeev Kapoor यांची लेक कोणा अभिनेत्रीहून कमी सुंदर दिसत नव्हती... त्यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यानिमित्त समोर आलेल्या फोटोंना पाहून तुम्हालाही तुमचे बाबा आठवतील... 

‘खाना खजाना’ फेम सेलिब्रिटी शेफ Sanjeev Kapoor, लेकिच्या लग्नात भावूक; सोशल मीडियावर Photo Viral

Sanjeev Kapoor Daughter wedding : ‘खाना खजाना’ या लज्जतदार शोमुळं प्रेक्षकांच्या भेटीला आलेला एक चेहरा सर्वांच्या मनाचा नव्हे सर्वांच्या चवीचा ठाव घेऊन गेला. हा चेहरा म्हणजे संजीव कपूर यांचा. युट्यूब व्लॉगिंगचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून संजीव कपूर यांनी त्यांच्या पाककलेच्या बळावर अनेकांनाच बहुविध पदार्थ कसे करायचे हे अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. अनेकांसाठी ते Masterchef झाले. पाहता पाहता शेफ संजीव कपूर यांना सेलिब्रिटींचा दर्जा प्राप्त झाला. चेहऱ्यावर सुरेख स्मितहास्य ठेवत त्यांनी किचकट पदार्थसुद्धा सहज पद्धतीनं करण्याचा मंत्रच जणू अनेकांना दिला. कायम आनंदी छटा असणारे हेच संजीव कपूर लेकिच्या लग्नात मात्र काहीसे भावूक झाले. कपूर यांची मुलगी रचितानं नुकतंच प्रियकर डॅरेन याच्याशी लग्नगाठ बांधली.

अधिक वाचा : 'माझ्याशी लग्न करा कारण मी तुमच्यावर प्रेम करते' प्रसिद्ध अभिनेत्रीने बीग बींना केलं प्रपोज

रचिताच्या लग्नातील काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर समोर आले. या फोटोंमध्ये नववधूच्या रुपात तिचं सौंदर्य आणखी खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे. गडद लाल रंगाचा लेहंगा, हेवी स्टोन ज्वेलही आणि त्याला साजेसा मेकअप- हेअरस्टाईल असा तिचा एकंदर वेडिंग लूक होता.

fallbacks

सूत्रांच्या माहितीनुसार रचिता, म्हणजेच संजीव कपूर यांच्या लेकिचा विवाहसोहळा हिंदू आणि ख्रिस्त धर्मपद्धतीनं पार पडला. रचितानं तिच्या लग्नासाठी पसंती दिलेले दोन्ही लूक सर्वांची मनं जिंकून गेले.

fallbacks

लेकिला या रुपात पाहताना वडील म्हणून संजीव कपूर यांच्याही भावना दाटून आल्या. पण, त्यांनी आनंदी चेहऱ्यामागे त्या भावना दडवल्या. लेकिला मोठं केल्यानंतर प्रत्येक वडिलांसाठी तिच्या पाठवणीचा क्षण तसा कठीणच... कपूर यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं.

Read More