Marathi News> मनोरंजन
Advertisement

मंगळसूत्र दाखवायचं होतं की आणखी काही...? पाहा कोणत्या डिझायनरवर भडकले नेटकरी

जाहिरातीचं कॅम्पेन रोषास बळी पडत आहे. 

मंगळसूत्र दाखवायचं होतं की आणखी काही...? पाहा कोणत्या डिझायनरवर भडकले नेटकरी

मुंबई : दागिन्यांच्या जाहिराती सहसा बऱ्याच कलात्मक आणि एखाद्या पारंपरिक संकल्पनेला धरून साकारण्यात येतात. अनेकदा या संकल्पनांना आधुनिकतेची जोड देण्यात येते. पण, सध्या मात्र एक प्रतिष्ठीत आणि तितकाच लोकप्रिय डिझायनर त्याच्या चौकटीबाहेरच्याच कलात्मकतेमुळे अनेकांच्या रोषास बळी पडताना दिसत आहे. 

हा सेलिब्रिटी डिझायनर आहे सब्यसाची मुखर्जी. सब्यसाचीनं कलात्मक ब्रायडल वेअर आणि कस्टमाईज डिझायनर कपड्यांसोबतच आता कस्टमाईज ज्वेलरीही सर्वांच्या भेटीला आणल्या. (, sabyasachi mangalsutra)

सब्यसाचीनं साकारलेले लेहंगे, आऊटफिट पाहिले की संस्कृती, कलात्मकता आणि सुरेख रंगसंगतीची झलक त्यामध्ये पाहायला मिळते. 

यावेळी मात्र त्याचं जाहिरातीचं कॅम्पेन रोषास बळी पडत आहे. 

सब्यसाचीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन नुकतेच काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. कस्टमाईज ज्वेलरी आणि मंगळसूत्र कलेक्शनच्या निमित्तानं काही मॉ़डेल या फोटोंमध्ये पोझ देताना दिसत आहेत. 

मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांची माहितीही सब्यसाचीनं दिली आहे. पण, यासाठी त्याने मॉडेल्सचं केलेलं फोटोशूट मात्र सर्वांनाच खटकत आहे. 

मंगळसूत्र प्रमोट करण्यासाठीच्या एका फोटोमध्ये दिसणारी मॉडेल ही बोल्ड अंदाजात दिसत असून, तिच्यासोबत शर्टलेस माणूसही दिसत आहे. 

दुसऱ्याही प्रोडक्टसाठी त्यानं काळ्या रंगाचे कपडे घातलेले, बोल्ड अंदाजातचे म़ॉडेल्स दाखवले आहेत. जे नेटकऱ्यांना खटकत आहे. 

मंगळसूत्र दाखवायचं होतं की आणखी काही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सदर जाहिरातींचा निषेध करत तीव्र नाराजीचा सूर आळवला आहे. 

काहींनी तर, ही इंटिमेट वेअरची जाहिरात आहे अशा शब्दांत कॅम्पेनची खिल्लीही उडवली. या साऱ्या प्रकरणावर आता सब्यसाची काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Read More