Marathi News> मनोरंजन
Advertisement

Chai Lover साठी सर्वात मोठी बातमी, आता मार्केटमध्ये आला 'सोन्याचा चहा'

 पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. 

 Chai Lover साठी सर्वात मोठी बातमी, आता मार्केटमध्ये आला 'सोन्याचा चहा'

मुंबई : अभिनेत्री सना खानने अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेला कायमचा राम-राम ठोकला आहे. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर सध्या अॅक्टीव्ह आहे. सध्या तिचा चहा पितानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

अनेक चाय लव्हर्ससाठी तिचा हा फोटो लक्षवेधून घेणारा ठरत आहे. आतापर्यंत अनेक प्रकारच्या चहाबद्दल आपण ऐकलं आहे. पण सना खानने प्यायलेला हा चहा सगळ्यांनाच चकीत करणारा आहे.

त्यामुळे ती पुन्हा एकदा सना खान चर्चेत आली आहे. यावेळी ती गोल्ड प्लेटेड चहा प्यायलामुळे चर्चेत आली. तिने बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीमध्ये जाऊन चहाचा आस्वाद घेतला आहे.

fallbacks

सना खानने दुबईतील बुर्ज खलिफा येथे 24 कॅरेट सोन्याचा मुलामा असलेला चहा प्यायला. सना खानने हे फोटो शेअर करताच काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला. पोस्ट शेअर करत बॉलिवूड अभिनेत्रीने पहिला चहाचा घोट घेतला.

दुबईमध्ये 'अॅटमॉस्फियर दुबई' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये सनाने अशा पद्धतीचा चहा पिण्याचा अनुभव घेतला आहे. जे जगातील सर्वात उंच रेस्टॉरंट असल्याचे म्हटले जाते.सना खान दुबईतील बुर्ज खलिफाला गेल्याची ही पहिलीच वेळ नाही.हे तिचं आवडतं ठिकाण आहे आणि ती अनेकदा दुबईत वेळ घालवताना दिसून येते. त्याची किंमत 3300 रुपये इतकी आहे.

Read More