Marathi News> मनोरंजन
Advertisement

Challenge : फोटोत एक-दोन नाही तर बॉलीवूडचे आहेत 5 स्टार; ओळखलं तर मानलं!

सोशल मीडियावर एक फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे

Challenge : फोटोत एक-दोन नाही तर बॉलीवूडचे आहेत 5 स्टार; ओळखलं तर मानलं!

मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स एकत्र आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहेत. मात्र, हा फोटो पाहून लोकांना या सेलिब्रिटींना ओळखणं सोपं नाही. या व्हायरल फोटोमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील 5 स्टार्स आहेत. पण त्यांना ओळखणं फार कमी लोकांना जमलं आहे. हा ग्रुप फोटो कपूर कुटुंबाचा आहे. पण तुम्हाला चलेंज आहे हा फोटो पाहून ?

रणबीर आणि सोनम कपूरही आहेत
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनम कपूर, रणबीर कपूर, अंशुला कपूर, अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि अर्जुन कपूर दिसत आहे. फोटोच्या मागच्या बाजूला, ज्या मुलाने आपल्या हातांनी विक्ट्री साइन बनवलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून रणबीर कपूर आहे.

अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत दिसत आहेत. सोनमच्या शेजारी अर्जुन कपूर लाल टी-शर्टमध्ये चष्मा घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर सोनमच्या मागे अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर एका मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे. आता कपूर कुटुंबातील स्टार्सचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लोक कमेंट करत आहेत
हा फोटो सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे. फोटोवर कमेंट्सद्वारे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने फोटोवर कमेंट केली आहे की, 'मी अर्जुन आणि सोनम कपूरला ओळखलं'. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'बेस्ट इज कपूर फॅमिली'. यूजर्स सतत या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Read More