Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुम्ही 'या' क्यूट मुलीला ओळखलं का? आज बनली आहे नॅशनल क्रश

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. 

तुम्ही 'या' क्यूट मुलीला ओळखलं का? आज बनली आहे नॅशनल क्रश

मुंबई : साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. रश्मिका दक्षिण भारतीय प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. आता तिने बॉलिवूडमध्येही जबरदस्त पकड निर्माण केली आहे. रश्मिका मंदान्ना देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. रश्मिकाचा बालपणीचा एक गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये रश्मिका पोनीटेलमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

रश्मिका मंदान्नाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सा वर्षाव केला आहे. आपल्या क्यूटनेसने सगळ्यांना वेड लावणारी रश्मिका लहानपणीही खूप गोड होती आणि तिचा हा फोटो व्हायरल झाल्याचा पुरावा देत आहे. रश्मिकाचा हा फोटो पाहिल्यानंतर तिचे डाय हार्ड चाहते तिला पटकन ओळखू लागले आहेत. त्याचबरोबर लाखो प्रयत्न करूनही काही लोकांना ओळखता येत नाहीये.  रश्मिका मंदान्नाचा हा फोटो 4-5 वर्षांचा असेल तेव्हाचा आहे

अल्लू अर्जुनसोबतच्या 'पुष्पा'मध्ये रश्मिका मंदान्नाला खूप पसंती मिळाली होती. आता लवकरच ही अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मध्ये दिसणार आहे. याशिवाय रश्मिका मंदान्ना 'गुडबाय'मध्येही दिसणार आहे. रश्मिकाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तो 'गीत गोविंदम', 'देवदास', 'डियर कॉम्रेड', 'सुलतान' आणि 'यजमान' या चित्रपटांमध्ये दिसली.

Read More