Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुष्मिता सेनच्या वहिनीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा बदललं आडनाव; चाहते आश्चर्यचकित

 सुष्मिता सेनची वहिनी सध्या चर्चेचा भाग आहे.

सुष्मिता सेनच्या वहिनीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा बदललं आडनाव; चाहते आश्चर्यचकित

मुंबई : सुष्मिता सेनची वहिनी सध्या चर्चेचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार, सुष्मिताचा भाऊ आणि तिची वहिनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होणार होते. पण आता असं दिसतं आहे की, दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे. चारू आणि राजीव  यांचं पॅचअप झालं आहे. चारूने इन्स्टाग्रामवर तिचं नावही बदलले दिसत आहे. जे पाहून असं म्हणता येईल की, दोघांनीही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर राजीवने चारूसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चारू असोपाने इन्स्टाग्रामवर तिचं आडनाव पुन्हा बदलेलं दिसत आहे. तिने आपलं सोशल मीडियाचं नाव बदलून चारू असोपा सेन असं ठेवलं आहे. तेव्हापासून तिचं आणि राजीवचं पॅचअप झाले असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

राजीवने शेअर केला फोटो 
राजीवने चारूसोबतचा एक गोंडस सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेल्फी शेअर करत तिने गुलाबाची इमोजी पोस्ट केली आहे. राजीव आणि चारूचा हा फोटो पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. फोटोत दोघंही आनंदी दिसत आहेत.

fallbacks

जेव्हा राजीवला त्याच्या आणि चारूच्या पॅचअपबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने एका मुलाखतीत केलेल्या खास संवादात सांगितलं की, 'माझ्या नवीन पोस्टमधील फोटोने सर्वकाही सांगितलं आहे.' चारूने आडनाव बदलल्यानंतरच राजीवने हा फोटो शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी चारूने तिच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की, तिची मुलगी जियानाच्या चांगल्या भविष्यासाठी ती राजीवपासून घटस्फोट घेत आहे. राजीव आणि चारूच्या घटस्फोटाची बातमी तेव्हा चर्चेत आली जेव्हा अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून हटवले. 

Read More