Marathi News> मनोरंजन
Advertisement

Charu Asopa Rajeev Sen Divorce : घटस्फोटाच्या बातम्यां दरम्यान सुष्मिता सेनच्या भावाचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. 

Charu Asopa Rajeev Sen Divorce : घटस्फोटाच्या बातम्यां दरम्यान सुष्मिता सेनच्या भावाचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

मुंबई : सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. बातम्यांनुसार, लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले होते. मात्र नंतर त्यांचं पॅचअप झालं. पण आता त्यांच्या नात्यात इतकी कटुता आली आहे की दोघांनी घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरून दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी चारू असोपाने राजीव सेन आणि त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर राजीव सेननेही त्यांच्या नात्याबाबत मौन सोडलं आहे. त्यानंतर त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

राजीव सेनने शेअर केली पोस्ट
चारू असोपा आणि त्यांच्या नात्यातील मतभेद असल्याच्या बातम्यांदरम्यान राजीव सेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजीवने लिहिलं, 'मला वाटतं की भारतात सध्या आणखी  खूप ब्रेकिंग न्यूज सुरू आहेत. मग ते चांगले असो वा वाईट. मी मीडियाला विनंती करतो की, माझ्या लग्नावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करू नका. सपोर्टीव्ह आणि पॉझिटिव्ह असल्याबद्दल सर्वांचे आभार. देव तुम्हाला आनंदी ठेवो.

fallbacks

काही दिवसांपूर्वी चारू असोपाने दिलेल्या एका मुलाखतीत राजीव आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यावेळी अभिनेत्री म्हणाली होती की, 'राजीवला ट्रस्टची समस्या आहे. मी माझ्या लग्नाला अनेक संधी दिल्या, पण आता अनेक गोष्टी असह्य झाल्या आहेत. माझ्या पहिल्या लग्नाच्या गोष्टी मी त्याच्यापासून लपवल्याचं राजीव म्हणाला. पण राजीवला माहीत होतं आणि त्यानेच मला पुढे जाण्यास मदत केली. आम्ही तुम्हाला सांगतो, चारू असोपाने वयाच्या १८ व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

Read More