Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : स्पर्म डोनेट करण्याविषयी आयुषमानचा मोठा खुलासा

गप्पांच्या ओघात आयुषमान म्हणाला.... 

VIDEO : स्पर्म डोनेट करण्याविषयी आयुषमानचा मोठा खुलासा

मुंबई : करण जोहरच्या सूत्रसंचालनाची सुरेख प्रचिती देणारा एक कार्यक्रम म्हणजे 'कॉफी विथ करण'. या धमाल चॅट शो मध्ये निर्माता- दिग्दर्शक करण जोहर कलाविश्वातील सेलिब्रिटींना आमंत्रित करत त्यांच्यासोबत गप्पा मारतो, विविध विषयांवर चर्चाही करतो. यावेळी करणसोबत कॉफी पिण्यासाठी आणि गप्पांचा फड रंगवण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होणारे सेलिब्रिटी आहे, अभिनेता आयुषमान खुराणा आणि अभिनेता विकी कौशल. 

'कॉफी....' च्या सहाव्या पर्वाच्या पुढील भागात, विकी आणि आयुषमान खुराना सहभागी होणार असून, नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो स्टार वर्ल्डकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये नेमक्या करण, विकी आणि आयुषमानमध्ये कोणत्या विषयांवर गप्पा रंगणार याचा खुलासा होत आहे. 

गप्पांच्याच ओघात करणसमोर काही गोष्टींचा उलगडा करताना आयुषमानने अशा एका गोष्टीचा खुलासा केला जे ऐकून खुद्द करणच्याही भुवया उंचावल्या. 'विकी डोनर' या चित्रपटामध्ये एका 'स्पर्म डोनर' अर्थात शुक्राणू देणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत तो झळकला होता. मुख्य म्हणजे फक्त चित्रपटच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही त्याने स्पर्म डोनेट केल्याची बाब या कार्यक्रमात स्वीकारली आहे. 

करणने हाच प्रश्न ज्यावेळी विकी कौशल याला विचारला तेव्हा त्याने आपण असं काहीच न केल्याचं स्पष्ट केलं. ज्यानंतर आयुषमानने त्याची खिल्ली उडवल्याचंही प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. 

Read More