Maharashtrachi Hasyajatra : आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळेच आपल्या गुरुला शुभेच्छा देतात. शाळेत असताना आपण फूल द्यायचो त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. मात्र, आजही अनेक विद्यार्थी हे त्यांच्या गुरुंना आठवणीनं गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. मग यात फक्त शाळेतील शिक्षक, कॉलेजमधील शिक्षक नाही तर कामाच्या ठिकाणी भेटणारे आपल्या गुरुंना देखील अनेक लोक शुभेच्छा देताना दिसतात. असंच काहीसं आपल्या सगळ्यांचा आवडता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झालं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवर चेतनानं तिच्या लाडक्या गुरूंचे आभार मानले त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडीओत चेतनाच्या हातात एक गुलाबाचं फूल पाहायला मिळतंय. तर त्यासोबत ती बोलताना दिसते की "गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला हे फूल द्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते तर माझ्यासोबत या." त्यानंतर ती समीर चौगुलेच्या रुममध्ये जाते. तर तिला पाहून समीर हॅलो म्हणतो आणि 'चल आपण करून आपली रिहर्सल', तर चेतना 'हो' म्हणत तिनं पाठीमागे लपवलेलं गुलाब पुढे करत म्हणते, 'दादा गुरुपौर्णिमेनिमित्त मला तुला हे द्यायचंय.' तर चेतनानं गुलाब देताना पाहून समीरला आश्चर्य आणि आनंद होतो आणि तो म्हणतो 'अरे किती गोड हे.' त्यानंतर चेतना समीरचा आशीर्वाद घेते. तर समीर 'तुझ्यावर कायम देवाचा आशीर्वाद राहू दे असं म्हणतो.' "
चेतनानं गुलाब देत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यानं समीर म्हणतो, "हा तर खूप मोठा मान आहे आणि दुसरीकडे चेतनाला आनंदाश्रू अनावर होतात. चेतनानं इतकं मोठं स्थान दिल्यानं समीर तिचे आभार मानतो आणि म्हणतो आमची चेतना मनानं जरा हळवी आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना दु:ख व्यक्त करताना लगेच तिच्या डोळ्यातून पाणी येतं."
चेतना पुढे समीरचं तिच्या आयुष्यातील स्थान याविषयी सांगताना म्हणाली, "खरंतर गोस्वामी सर आणि मोटे सर आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी आहेत. ते सगळ्यांच्याच गुरुस्थानी आहेत. पण दादा इथे जे रिहर्सल करुन घेतो. ते सर कधी कधी तिथे रिडिंगला सांगतात पण ते पोहोचत नाही. पण माझ्यासाठी दादा सगळ्याच पद्धतीनं गुरुस्थानी आहे. कोणतीही पर्सनल गोष्टीतही तो खूप मदत करतो. हे आनंदआश्रू आहेत. मला माहित नाही की लोकांना दिसताना कसं दिसेल. पण या खऱ्या फिलिंग आहेस दादा तुझ्यासाठी असलेल्या. त्यामुळे तुझे खूप आभार."
समीर पुढे याविषयी बोलताना म्हणाला, "तुम्ही बघत असाल तर आम्ही सगळेच एक कुटुंब आहोत. मला खरंतर हे काहीच माहित नव्हतं अचानक तिनं हे फूल मला दिलं, पण चेतना तू सगळ्यांची खूप लाडकी आहेस. तुला खूप शुभेच्छा मी आणखी काय सांगू आशीर्वाद देण्या इतका मी अजून स्वत: ला इतकं मोठं समजत नाही. पण वय मोठं असल्यामुळे मी अगदी मनापासून शुभेच्छा देतोय, आशीर्वाद देतोय आणि असंच प्रेम राहू देत. देवाचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहू देत." चेतना आणि समीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.