Marathi News> मनोरंजन
Advertisement

'छावा' चित्रपटातील ‘लेझीम’ वर आक्षेप नको घ्यायला होता! नेमकं काय म्हणाला संतोष जुवेकर?

Chhaava Movie Lazim Dance : 'छावा' या चित्रपटातील ‘लेझीम’ वर आक्षेप नको घ्यायला होता! नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संतोष जुवेकर स्पष्टच बोलला...

'छावा' चित्रपटातील ‘लेझीम’ वर आक्षेप नको घ्यायला होता! नेमकं काय म्हणाला संतोष जुवेकर?

Chhaava Movie Lazim Dance : सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा'. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटातील फक्त विकीची भूमिका नाही तर त्यासोबत इतर भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत. त्यातही त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी जो अभिनय केला तर त्यांचं कौतूक होत आहे. या चित्रपटात रायाजी ही भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाची सगळीकडून स्तुती होत आहे. तर याशिवाय ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे या चित्रपटातील लेझीम नृत्य.. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम नृत्य करताना पाहिलं पण हे आपण चित्रपटात पाहिलं नाही. लेझीम नृत्य असलेलं हे गाणं कसं शूट झालं तेव्हा सगळ्यांच्या काय भावना होत्या याविषयी संतोष जुवेकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

मुलाखतीत जेव्हा संतोषला विचारण्यात आलं की लेझीम नृत्यचा जो सीन आहे जो कोणी पाहिला नाही तो शूट करतानाचा अनुभव कसा होता. नेमकं काय झालं होतं. त्याविषयी सांगत संतोष म्हणाला, 'बुऱ्हाणपूरची लढाई झाल्यावर महाराज आपलं सैन्य आणि सहकाऱ्यांसोबत पुन्हा रायगडावर येतात. तेव्हा महाराजांचं औक्षण केलं जातं. यानंतर येसुबाई आणि धाराऊ त्यांना ओवाळून रयतेकडून राजांचं स्वागत केलं जातं. त्यावेळी हा आनंदोत्सवा साजरा केला जातो, त्याचंच हे गाणं आहे. त्या गाण्यात लेझीम हा आपला पारंपरिक सांस्कृतिक खेळ खेळला जातोय. तिथे एक-दोन मावळे राजांजवळ जाऊन त्यांच्यासमोर लेझीम धरतात अन् त्यांना खेळण्यासाठी आग्रह करतात, असं त्या गाण्यात होतं. महाराजांकडे ती लेझीम येते. आम्ही सर्व मावळे बाजूला उभे असतो. महाराज येसूबाईंकडे बघतात. येसूबाई त्यांना होकारार्थी अशी प्रतिक्रिया देतात आणि मग  महाराज आणि येसूबाई लेझीमचे तीन-चार डाव खेळतात.'

संतोष पुढे गाण्याच्या शूटिंगविषयी सांगत म्हणाला, 'आम्ही जवळपास 4 ते 5 दिवस ते गाणं शूट केलं. मला अजूनही आठवतंय गाण्याच्या पहिल्या दिवशी जे आमचे कोरिओग्राफर होते त्यांना लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मुझे सिर्फ लेझीम चाहिए. कोई स्टेप या डान्स नही! मुझे डान्स मैं भी शेर चाहिए. लेझीम खेळताना सुद्धा तो आनंद हा वाघाचा आनंद वाटला पाहिजे. तिथे कुठेही हिरो दिसता कामा नये, इतके स्पष्ट विचार होते सरांचे.'

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेला लग्नाआधीच मुलं! प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली...

पुढे लक्ष्मण उतेकर शूटिंग करताना कशा प्रकारे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत होते हे सांगत म्हणाला, 'दरवेळेस शूटिंग करताना लक्ष्मण सरांना काही वेगळं वाटलं की, तरी ते थांबायचे. कारण त्यांना फक्त लेझीम हवी होती. हिरो-हिरोईन आणि साईड डान्सर असं त्यांना काही नको होतं. ही सगळी रयत आनंदोत्सव साजरा करतेय आणि हे महाराज आहेत. इतकं सुंदर गाणं कोणीतरी आधी पाहिलं असतं तर आज ते गाणं असतं. एखाद्या छोट्याश्या क्लीपवरुन महाराज असे नाचू कसे शकतात असे प्रश्न समोर आले... का? आता आपण बघतो की अनेक पक्षांचे नेते निवडून येतात. त्यांचे कार्यकर्ते ढोल-ताशे घेऊन जल्लोष करत नाचतात. तेव्हा कार्यकर्ते नेत्याला बोलावतात. कार्यकर्त्यासोबत नेतेही थोडंसं नाचतात ना हात वर करुन. मग माझे राजे दोन डाव खेळले असतील ना.' संतोष जुवेकरानं ही मुलाखत 'न्यूज 18' ला दिली होती. 

Read More