Marathi News> मनोरंजन
Advertisement

Child of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

अंकिताने स्वतःच्या भावनांना करून दिली वाट 

Child of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट

मुंबई : CHILD Of GOD... म्हणतं अखेर अंकिता लोखंडेने एक महिन्यानंतर व्यक्त केल्या आपल्या भावना. अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला आज १४ जुलै रोजी एक महिना झाला आहे. आज अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. 

या फोटोत तिने देवासमोर एक दिवा लावला असून CHILD Of GOD असं म्हटलं आहे. तिने तिच्या घरातील देव्हाऱ्यासमोर हा दिवा लावला आहे. सुशांतला आठवत तो परमेश्वराचं बाळ आहे असं म्हटलं आहे. तिने सुशांतला अतिशय शांतपणे आठवलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

CHILD Of GOD 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

१४ जून रोजी राहत्या घरी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतची आत्महत्या हा साऱ्यांनाच मोठा धक्का होता. त्याच्या आत्महत्येनंतर अंकिता आपल्या आईसोबत सुशांतच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. त्यानंतर ती पटनाला त्याच्या गावी देखील गेल्याचं सुशांतच्या वडिलांनी सांगितलं.

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघं एकमेकांपासून लांब झाले आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर अंकिताने स्वतःला आयसोलेट करून घेतलं. पण आता अखेर एका महिन्यानंतर तिने स्वतःच्या भावनांना वाट करून दिली. 

Read More