Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर बॉबी देओलच्या घरी भाड्यानं राहतेय ही अभिनेत्री

 या दरम्यान चित्रांगदाला ट्रेकिंग, क्लायम्बिंग आणि फिशिंग करतानाही पाहीलं गेलं.

घटस्फोटानंतर बॉबी देओलच्या घरी भाड्यानं राहतेय ही अभिनेत्री

मुंबई : अभिनेत्री चित्रांगदा सिंह गेल्या प्रदीर्घ काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे... ती सध्या कुठे आहे? काय करते? हे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहजच लक्षात येतं. सध्या चित्रांगदा श्रीनगरमध्ये हॉलिडे एन्जॉय करताना दिसतेय. आपलं कुटुंब आणि मित्र-मंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी चित्रांगदा सध्या श्रीनगर दौऱ्यावर आहे. या दरम्यान चित्रांगदाला ट्रेकिंग, क्लायम्बिंग आणि फिशिंग करतानाही पाहीलं गेलं. चित्रांगदानं २००१ मध्ये गोल्फ खेळाडू ज्योति रंधावा याच्यासोबत विवाह केला होता. २०१४ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना जोरावर रंधावा नावाचा एक मुलगाही आहे. 

 

No signal #chitrangdasingh #bollywood

A post shared by Chitrangda Singh (@iamchitrangda) on

सध्या चित्रांगदा आपल्या मुलासोबत बॉबी देओलच्या घरी भाड्यानं राहतेय. बॉबीचे वडील अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये बरीचशी गुंतवणूक आहे... आणि त्यांनी मुंबईत अनेक फ्लॅटस् विकत घेतलेले आहेत. ज्या घरात चित्रांगदा राहतेय ते घर बॉबीच्या नावावर आहे.

राजस्थानमध्ये जन्म झालेली चित्रांगदा सिंह एका आर्मी ऑफिसरची मुलगी आहे. तिचा भाऊ दिग्विजय सिंह हा देखील गोल्फ खेळाडू आहे. चित्रांगदा आगामी काळात 'साहब, बीवी और गँगस्टर - ३' आणि 'बाजार' या सिनेमांत दिसणार आहे. तसंच ती एक डान्स रिअॅलिटी कार्यक्रमातही जज म्हणून दिसतेय. 

Read More