Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर खिलाडी कुमार, आमिरचा सामना टळला

मध्यस्ती किंवा आणखी काही, या चर्चेमुळे 'बच्चन....'

अखेर खिलाडी कुमार, आमिरचा सामना टळला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेली कित्येक वर्षे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. असा हा अभिनेता आणि परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्यामध्ये येत्या काळात सामना रंगणार अशा चर्चा होत्या. किंबहुना तसं चित्रही स्पष्टपणे दिसत होतं. 

आमिर आणि खिलाडी कुमार यांच्या होणारी ही टक्कर मात्र आता टळली असल्याची माहिती समोर येत आहे. Akshay kumar अक्षय कुमारने त्याच्या bachchan pandey 'बच्चन पांडे' या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सर्वांसमोर आणली आहे. 

अक्षय़ कुमारने घेतलेला हा निर्णय पाहता खुद्द aamir khan आमिरने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. ''कधीकधी चर्चाच अनेक मुद्द्यांवर तोडगा असते. मी अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखत 'बच्चन पांडे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली. मी त्यांच्या चित्रपटाच्या यशासाठी खुप साऱ्या शुभेच्छा देतो'', असं ट्विट आमिरने केलं. परस्पर समजुतीने आमिर आणि अक्षयने त्यांच्यातील या गोष्टीवर तोडगा काढला. ज्याची कलाविश्वात चर्चा केली जात आहे. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

अक्षयच्या या निर्णयामुळे आता पुढच्या वर्षअखेरीस प्रेक्षकांनाना 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट पाहता येणार आहे. तर, २०२१च्या सुरुवातीला खिलाडी कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना या चित्रपटांचा दिलखुलास आस्वाद घेता येणार आहे. 

 

Read More