Marathi News> मनोरंजन
Advertisement

'उसे मेरी आँखों ने…' कोसळत्या पावसावर अमृता फडणवींसांच्या आवाजातील नवं हिंदी गाणं, VIDEO पाहिलात का?

Amruta Fadanvis Song: अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनवरुन एक नवं हिंदी गाणं रिलीज केलंय.

'उसे मेरी आँखों ने…' कोसळत्या पावसावर अमृता फडणवींसांच्या आवाजातील नवं हिंदी गाणं, VIDEO पाहिलात का?

Amruta Fadanvis Song: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय. एक बॅंकर, समाजसेविका असण्यासोबतच त्या आपल्या गायनाची आवडही जपत असतात. अनेक प्लॅटफॉर्मवरुन आपण त्यांना गाणं गाताना ऐकलंय. त्यांचा आवाजाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. नुकताच पावसावर त्यांचा एक म्युझिक अल्बन रिलीझ झालाय. ज्यावर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनवरुन एक नवं हिंदी गाणं रिलीज केलंय. 'इस बार तुम्हारे शहर मे जो सावन आया है, उसे मेरी आखोनेही बरसाना सिखाया है' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाण अपलोड झाल्यापासूनच चर्चेत आहे. 10 जुलै रोजी हे गाणं अपलोड करण्यात आलं असून याला 1 कोटीहून अधिक व्हूज मिळाले आहेत. अनिष 2.0 ने हे गाणं दिग्दर्शित केलं असून शिंदा सिंघ हे याचे डीओपी आहेत तर राहूल सेगल याचे ईपी आहेत. आरएस फिल्म्स या गाण्याचे लाईन प्रोड्यूसर असून अभिमन्यू यांनी याचे व्हीएफएक्स केलंय. 2.45 मिनिटांचे हे गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गायलंय. 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

अमृता फडणवीसांच्या या गाण्यावर चाहत्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. खूप छान साँग. सॅल्युट आहे. मॅम तुम्हाला सर्व सुख सुविधा तुमच्या पायाशी लोळण घालत असताना तुम्ही एवढा हार्ड वर्क करून तुमच्या आवडीच्या कामाला तुम्ही वेळ देता आणि ते करता ग्रेट अशी प्रतिक्रिया एकाने दिलीय. खुप छान आपण देवेंद्र यांची पत्नी शोभता हजार विरोधक असु द्या पण आपण आपला निर्णयावर ठाम! अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिलीय. 

अमृता फडणवीस यांच्या म्युझिक करियरविषयी..

अमृता फडणवीस यांनी गायिका म्हणून एक उल्लेखनीय करिअर घडवले आहे. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि विविध सामाजिक आणि व्यावसायिक मंचांवर गायन केले आहे. त्यांनी 2016 मध्ये प्रकाश झा दिग्दर्शित "जय गंगाजल" या चित्रपटात "सब धन माटी" या गीताने पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. यानंतर त्यांनी "संघर्ष यात्रा" या गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी गीत गायले. त्यांनी टी-सीरीज निर्मित "फिर से" या गाण्यात गायनाबरोबरच अभिनयही केला, ज्याला पहिल्या दिवशी 7 लाखांहून अधिक आणि तीन दिवसांत 14 लाखांहून अधिक दृश्ये मिळाली. 2022 मध्ये महाशिवरात्रिनिमित्त त्यांनी शिव तांडव स्तोत्र या संस्कृत भजनाचे गायन केले, जे टाइम्स म्यूजिक ने प्रसिद्ध केले आणि यूट्यूबवर 14 एप्रिल 2022 पर्यंत 12 दशलक्षांहून अधिक वेळा पाहिले गेले.

याशिवाय अमृता फडणवस यांनी "तेरी मेरी प्रेम कहानी" (बी प्राक सोबत), "तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या", आणि "अज मैं मूड बना लिया" (पंजाबी गीत) यांसारख्या गाण्यांमधून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा परिचय दिला. 2023 मध्ये त्यांनी "दमा दम मस्त कलंदर" या भजनाला आपल्या मधुर आवाजात सादर केले, ज्यामध्ये त्यांनी नृत्यही केले. त्यांच्या गाण्यांना यूट्यूबवर लाखो दृश्ये मिळाली असली, तरी काही गाण्यांना टीकाही झाली, उदा., "तिला जगू द्या" या गाण्याला डिसलाइक्सचा पाऊस पडला होता. तरीही, त्यांनी गायन क्षेत्रात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे, आणि त्यांच्या गाण्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा मिळते.

Read More