Intimate Scene Shoot: हिंदी चित्रपटांमधील इंटिमेट सीन्स ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र मागील काही काळापासून सेटवर असे सीन शूट करण्यासाठी 'इंटिमेट कॉर्डिनेटर' नियुक्त केले जातात. आता अनेकांना 'इंटिमेट कॉर्डिनेटर' म्हणजे काय? तो नक्की सेटवर काय करतो यासारखे प्रश्न पडतात. मात्र 'इंटिमेट कॉर्डिनेटर'ची गरज का असते हे एका अभिनेत्रीने तिला आलेल्या अनुभवावरुन सांगितलं आहे. सामान्यपणे सेक्स सीन्स शूट करताना 'इंटिमेट कॉर्डिनेटर'ची गरज पडते. अनेक अभिनेत्रींना वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेटवर हे असले इंटिमेट सिन्स शूट करताना काही विचित्र अनुभव येतात. याच अनुभवांमधून आता 'इंटिमेट कॉर्डिनेटर'ची गरज निर्माण झाली असून हल्ले हे लोक सेटवर सहज दिसून येतात. या अशा 'इंटिमेट कॉर्डिनेटर'च्या गरजेबद्दल एका अभिनेत्रीने नुकतेच उघडपणे आपले मत व्यक्त केले.
अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने तिला आलेल्या एका अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. 'पद्मावत', 'टायगर जिंदा है', 'वॉर 2' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुप्रियाने अशाच एका सीनच्या शूटदरम्यान मर्यादा ओलांडल्यासारखं वाटलं. "माझ्यासोबत असला प्रकार दोनदा घडलाय. एकदा, समोरची व्यक्ती माझा गैरफायदा घेतेय असं म्हणता येणार नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळी घडलेल्या प्रकाराला अतिउत्साह कारणीभूत ठरलेला. मला दिसत होतं की सहकलाकार अतिउत्साही झाला आहे. खरं तर असं व्हायला नको होतं. अशावेळी तुम्हाला अवघडल्यासारखं आणि समोरच्याने मर्यादा ओलांडल्यासारखं वाटतं. आम्ही किसिंग सिन्स शूट करत असताना हा सारा प्रकार घडला," असं अनुप्रिया म्हणाली.
"असं एकदा, मी मला अत्यंत अवघडल्यासारखे कपडे परिधान करण्यासाठी दिलेले. मला त्यात अजिबात कम्पर्टेबल वाटत नव्हतं. सहकलाकार म्हणून मला अपेक्षा होती की एक पुरुष म्हणून अशा सीनच्या वेळी अभिनेत्रीला कंबरेजवळ पकडून सीन शूट करणं योग्य ठरेल याची कल्पना असावी. मात्र त्याने अगदी माझ्या पार्श्वभागावर हात ठेवला. खरं तर त्याची गरज नव्हती. त्याला माझ्या कंबरेवर हात ठेवता आला असता," असं अनुप्रियाने सिद्धार्थ कननच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'हनिमून संपेपर्यंत अजय थकून गेला, त्याला सतत...', काजोलचा खुलासा; म्हणाली, 'मी लग्नाआधीच..'
"मीच हळूच त्याचा हात वर कंबेरकडे सरकवला. मी त्याला खालच्या बाजूला नाही इथे वर पकड असं सांगितलं. मात्र त्यावेळी मला तू असं का केलं हे त्याला विचारण्याचं धौर्य झालं नाही. कारण त्यावेळी त्याने सहज चूक झाली असं म्हणून सारं उडवून लावलं असतं. त्यावेळी मला त्याचा विरोध करता आला नसता. मात्र मी त्याला सांगितलं की, "पुढच्या सीनला हे असं करु नको तर इथे (कंबरेजवळ) पकड." त्याने तसं केलं," असं अनुप्रिया म्हणाली. तसेच, किसींग सीनदरम्यानही सहकलाकार वाहवत जाऊ शकतात असं ती म्हणाली. "अनेकदा लोक वाहवत जातात आणि ते तुम्हाला सहन करण्यापलिकडे जातं," असं अनुप्रियाने सांगितलं.
अनुप्रियाने 'बॉबी जासूस', 'पाठशाला', 'मेरे देश की धरती' या सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अनुप्रियाने 'सिक्रेड गेम्स', 'अभय', 'क्रिमिनल जस्टीस', 'असूर' आणि 'सुल्तान ऑफ दिल्ली'सारख्या वेब-सिरीजमध्येही काम केलं आहे.