Marathi News> मनोरंजन
Advertisement

आता असा दिसतोय कपिल शर्मा...

 एक काळ होता, जेव्हा कॉमेडियन कपिल शर्माचा चांगलाच बोलबाला होता.

आता असा दिसतोय कपिल शर्मा...

मुंबई : एक काळ होता, जेव्हा कॉमेडियन कपिल शर्माचा चांगलाच बोलबाला होता. त्याचा कपिल शर्मा हा शो टी.व्ही. च्या प्राईम टाईमचा एक भाग होता. तो शो देखील अत्यंत लोकप्रिय होता. लोकांना त्याची सवय झाली होती. पण गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माचे दारुचे व्यसन खूप वाढल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्याने टी.व्ही., कॉमेडीपासून नाते तोडले. दारूचे व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रातही तो काही काळ होता. त्यानंतर त्याचा फॅमेली टाईम हा नवा फोन ऑनएअर झाला. पण तो ही ३-४ एपिसोडमध्ये बंद पडला. 

अलिकडेच कपिल शर्माला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. त्याचा बदलेला अंदाज पाहुन तुम्ही थक्क व्हाल. यात कपिल शर्मा काहीसा जाड दिसत आहे. फिरंगी सिनेमासाठी कपिलने वजन कमी केले होते आणि नेहमीच आपल्या शो मधून तो लोकांना फिटनेसचे सल्ले द्यायचा. पण आता कपिलकडे पाहुन असे वाटते की, तो फिटनेसपासून खूप लांब गेला आहे.

fallbacks

फक्त टी.व्ही. नाही तर सोशल मीडियापासूनही दूर राहणे कपिलने पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्विटरवर परतला आहे. यातून तो लाईफस्टाईल बदलत असल्याचे सांगितले आहे. 

Read More