Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता; फोन बंद, पत्नी म्हणाली, 'उद्या संपूर्ण माहिती सांगेल'

कॉमेडियन सुनील पाल गेल्या काही तांसांपासून बेपत्ता होता. त्याचा फोनही बंद असल्याने पत्नी तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचली होती, मात्र...

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता; फोन बंद, पत्नी म्हणाली, 'उद्या संपूर्ण माहिती सांगेल'

कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता असल्याची बातमी मंगळवारी (3 डिसेंबर) ला समोर आली होती. 1 डिसेंबरला सुनील हा स्टँडअप कॉमेडी शो करण्यासाठी शहराबाहेर गेला होता. मंगळवारी (3 डिसेंबर) ला तो मुंबईत परतणार होता, असं त्याची पत्नी सरिता पाल सांगितलं. पण तो घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद होता, म्हणून पत्नी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुनील बेपत्ता असल्याची तक्रार तिने पोलिसांनी दिली. 

मात्र तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांनी सुनील सापडला. सुनीलची पत्नी सरिता हिने दैनिक भास्करसोबत शेअर केलेल्या अपडेटनुसार सुनील ठीक आहे आणि तो दिल्लीहून मुंबईला परत येत आहे. मला आता काही फार काही विचारु नका. सध्या मी पोलीस ठाण्यात आहे. तो एका पोलिसाशी बोलला आणि त्यांना सांगितलं की तो परत येत आहे. आता आम्ही त्याचा येण्याची वाट पाहत आहोत. त्याच्याशी बोलून मला जे काही समजेल. त्याबद्दल उद्या बुधवारी (4 डिसेंबर) ला पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती देईल, असं सांगितलंय. 

सुनीलला 2005 मधील 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोचे विजेतेपद त्याने पटकावल्यानंतर त्याला खरं ओळख मिळाली. त्यानंतर सुनील अनेक कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये दिसायला लागला. त्याने स्टँड-अप कॉमेडीही केली त्याशिवाय चित्रपटांमध्ये तो झळकलाय. त्याने 'हम तुम' (2004) आणि 'फिर हेरा फेरी' (2006) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.

Read More