Marathi News> मनोरंजन
Advertisement

Confirmed! प्रियंका चोप्रा - निक जोनस या ठिकाणी करणार लग्न?

कुठे होणार लग्न 

Confirmed! प्रियंका चोप्रा - निक जोनस या ठिकाणी करणार लग्न?

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. मुंबईत साखरपुडा पार पडल्यावर अगदी हे लग्न कधी आणि कुठे होणार याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता अखेर या लग्नाची कन्फर्म माहिती समोर आली आहे. खरं म्हणजे प्रियंका - निक यांच लग्न हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षीत लग्न आहे. अखेर या लग्नाची माहिती समोर आली आहे. हे लग्नं यंदा 2018 मध्ये नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 

पण हे लग्न कुठे होणार याबाबत खूप चर्चा रंगली होती. काही जण म्हणत होते की, हे लग्न अमेरिकेत होणार तर काहींनी म्हटलं की प्रियंका अनुष्काच्या पावलावर पाऊल ठेवत इटलीत हे लग्न करणार आहे. पण अखेर हे डेस्टिनेशन वेडिंग कुठे होणार याची माहिती समोर आली आहे. हे लग्न भारतातील एका खास ठिकाणी होणार आहे. प्रियंका चोप्राने बिग फॅट इंडियन वेडिंग करता भारतातील जोधपुरची निवड करण्यात आली आहे. 

प्रियंका - निक नोव्हेंबरमध्ये जोधपुरमधील उम्मेद भवन येथे सात फेरे घेणार आहेत. या लग्न समारंभाला फक्त 200 लोकांना आमंत्रण देण्यात येणार आहे. या लग्नाकरता स्पेशल डिझाइन वेडिंग कार्ड देण्यात येणार आहे. त्यांनाच फक्त या लग्नाला आमंत्रण असणार आहे. पण या लग्नाअगोदर प्रियंका चोप्रा न्यूयॉर्कमध्ये ब्रायडल शॉवर करणार आहे. प्रियंका आणि निकचे खूप मित्र परिवार हा न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यांच्याकरता हा सोहळा ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्यानंतर जोधपुरमध्ये हे दोघे सात फेरे घेतील. 

Read More