Marathi News> मनोरंजन
Advertisement

Randhir Kapoor Tested Positive : लस घेऊनही रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

रणधीर कपूर यांचे पाच मदतनीस देखील कोरोना पॉझिटिव्ह 

Randhir Kapoor Tested Positive : लस घेऊनही रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस घेतल्यांतरही अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. याबाबतची माहिती स्वतः 74 वर्षीय रणधीर कपूर यांनी दिली आहे. (Covid-19 Positive Randhir Kapoor Shifted to ICU for Further Tests) त्यांनी म्हटलं की,'मला पुढील काही टेस्ट्सकरता इंटेंसिव केअर यूनिट (ICU) मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.'

रणधीर कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार,'रूग्णालयात माझी खूप चांगली काळजी घेत आहे. स्वतः टीना अंबानी देखील माझी काळजी घेत आहे. ते माझ्यासाठी खूप काळजी घेत आहेत. सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत. संपूर्ण वेळ डॉक्टर्स माझ्यासोबत राहतात. कोरोनाच्या दोन्ही डोस घेतल्या असूनही त्यांना कोरोनाची लागण कशी झाली ते माहित नाही.'

पुढे ते म्हणाले की,'मला कळतच नाही की, मला कोविडची लागण कशी झाली आहे. मी हैराण आहे. माझा पाचजणांचा स्टाफ देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते देखील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.' रिपोर्टनुसार, ICU मधून शिफ्ट होण्याअगोदर रणधीर कपूर यांना शरीर अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा त्यांनी कोरोनाची चाचणी केली. कारण ते निश्चिंत राहू शकतात. त्यांना हलका ताप देखील होता. मात्र आता ते उत्तम आहेत. 

रणधीर यांना फार त्रास होत नाही. आता ते उत्तम आहेत. त्यांना आता ICU मधून बाहेर काढलं असून ऑक्सिजनची देखील आवश्यकता नाही. करीना आणि करिश्मा या दोघींची आणि बबिता या तिघींचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 15 फेब्रवारी 1973 साली रणधीर कपूर यांनी 'श्री 420' सिनेमातून बालकलाकार म्हणून काम केलं आहे. 

Read More