Marathi News> मनोरंजन
Advertisement

मसूरीत सुरू असलेल्या शाहीद कपूरच्या चित्रपटातील क्रू मेंबरचा मृत्यू

जनरेटरच्या फॅनमध्ये अडकून शाहिद कपूरच्या चित्रपटातील क्रूचा मृत्यू

मसूरीत सुरू असलेल्या शाहीद कपूरच्या चित्रपटातील क्रू मेंबरचा मृत्यू

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा आगामी चित्रपट 'कबीर सिंह'चे मसूरीमध्ये चित्रिकरण चालू आहे. परंतु या चित्रिकरणादरम्यान एक दुर्घटना घडली आहे. चित्रीकरणावेळी चित्रपटाच्या एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. 

मसूरीतील एका हॉटेलमध्ये 'कबीर सिंह' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी एका जनरेटर कंपनीसोबत काम करणाऱ्या 30 वर्षीय रामू या व्यक्तीला हॉटेलमध्ये जनरेटर दुरूस्त करण्यासाठी बोलवण्यात आले होते. जनरेटर दुरूस्त करण्यावेळी अचानक रामूच्या टोक्यातील मफलर जनरेटरच्या फॅनमध्ये अडकले. यात रामू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी देहरादून येथील रूग्णालयात नेत असतानाच रामूचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मृत रामू मुजफ्फरनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेप्रकरणी मृत रामूच्या घरी सांगण्यात आले आहे.   

Read More