Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा आयटम साँगवर बोल्ड डान्स, पाहणारे पाहतच राहिले

 तिच्या डान्सवर सगळेच फिदा झाले आहेत. 

प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा आयटम साँगवर बोल्ड डान्स, पाहणारे पाहतच राहिले

मुंबई : सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहते देखील खूप उत्सुक असतात. असं काहीसं कोरियोग्राफर धनश्री वर्माच्या बाबतीत देखील आहे. 

धनश्री वर्मा तिच्या दमदार डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टीव्ह असते. ती डान्स कोरिओग्राफर असून दमदार व्हिडिओ ती पोस्ट करताना दिसतेय. मागील वर्षी तिने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत लग्नगाठ बांधली. 

त्यानंतर हे सेलिब्रिटी कपल खूपच चर्चेत आलं. दोघेही एकमेकांना डेट करत असतानाही धनश्री चाहत्यांचं लक्षवेधून घेत होती. तिची स्टाईल पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले होते. आता तिने पुष्पा सिनेमाच्या गाण्यांवर एक व्हिडिओ शूट केला आहे. 

पुष्पा हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच खूप चर्चेत आहे. या सिनेमाची गाणी खूपच हिट झाली आहेत. आता धनश्रीने ही या सिनेमातील गाण्यावर बोल्ड अंदाजात एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या डान्सवर सगळेच फिदा झाले आहेत. 

Read More
;