Marathi News> मनोरंजन
Advertisement

सईच्या प्रेमात 'आवारा' झाला सलमान

'दबंग ३' चित्रपटातील 'आवारा' गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.   

सईच्या प्रेमात 'आवारा' झाला सलमान

मुंबई : 'मांगे फकीर दुवाएं अल्लाह, यार दी सूरत माशाअल्लाह...' प्रेमावर आधारित 'दबंग ३' चित्रपटातील 'आवारा' गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग ३' चित्रपटाची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. याचा प्रत्येय 'आवारा' गाण्याच्या माध्यमातून होत आहे. सलमानने गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. 

काही दिवसांपूर्वी सलमानने गाण्याचा ऑडिओ प्रदर्शित केला होता. त्यामुळे या गाण्यात सलमान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर पैकी कोणासोबत रोमांन्स करताना दिसेल? असा प्रश्न उपस्थित राहिला होता. पण या गाण्यामध्ये तो आणि सई रोमांन्स करताना दिसत आहे. 

जेष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची कन्या 'दबंग ३' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई झळकणार आहे. 'दबंग-३' चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

शिवाय काही दिवसांपासून 'दबंग ३' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवस अगोदरच बुधवारी संध्याकाळी 'बॉयकॉट दबंग 3' (Boycott Dabangg 3)ट्विटरवर ट्रेंड होत होता. त्यानंतर सलमान खानने सिनेमासंदर्भात खूप मोठा निर्णय घेतला. 

'दबंग 3' सिनेमातील 'हुड हुड दबंग...' सिनेमातील गाण्याला कडाडून विरोध होत आहे. या सिनेमातील गाण्यात साधू संतांना गिटार पकडून डान्स करताना दाखवलं आहे. काही लोकांनी गाण्यातील या दृष्याला विरोध केला होता. ज्यामुळे 'बॉयकॉट 3' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. अधिकृत केलेल्या घोषणेत ही दृश्ये काढण्यात आल्याच सांगण्यात आलं आहे. 

Read More