Marathi News> मनोरंजन
Advertisement

पॉप सिंगर दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

 पंजाबमधल्या पटियाला न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. मात्र दलेर जामीन मिळाल्यानं सध्या तरी तो मोकाट आहे. 

पॉप सिंगर दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

मुंबई : प्रसिद्ध पॉप सिंगर दलेर मेहंदीला मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलंय. पंजाबमधल्या पटियाला न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. मात्र दलेर जामीन मिळाल्यानं सध्या तरी तो मोकाट आहे. 

दलेर मेहंदीवर मानवी तस्करीचे आरोप

2003 मध्ये दलेर मेहंदीवर मानवी तस्करीचे आरोप झाले होते. त्यानंतर बख्शीश सिंह नावाच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर 2003 मध्ये दलेरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दलेर बंधुंच्याविरोधात फसवणुकीचेही 35 गुन्हे

दलेरचा भाऊ शमशेरविरोधातही मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दलेर बंधुंच्याविरोधात फसवणुकीचेही 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read More