Marathi News> मनोरंजन
Advertisement

हाय हील्स सँडलमध्ये डान्स पाहून व्हाल थक्क (व्हिडिओ)

सोशल मीडियावर हा प्रॉपवाला डान्स सध्या भलताच व्हायरल झाला आहे.

हाय हील्स सँडलमध्ये डान्स पाहून व्हाल थक्क (व्हिडिओ)

मुंबई: हाय हील्स सँडल घालून अगदी वेगात आणि तेही आत्मविश्वासाने मुली चालूच कशा शकतात? त्यांना तोल जाण्याचा किंवा पाय लचकण्याची भीती वाटत नाही का? हा भाबडा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडलेला असतो. पण, हा प्रश्न पडलेल्या मंडळींसाठी आणखी धक्का तर पुढेच आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा. या व्हिडिओत मुलींनी हाय हिल्स सँडल पायात केवळ घातलेच नाहीत तर, ते घालून त्या सुंदर डान्सही करत आहेत. विशेष असे की, हा डान्स करताना त्यांचा तोल जराही ढळत नाही. किंवा त्यांच्यातील आत्मविश्वास जराही कमी झालेला दिसत नाही.

सोशल मीडियावर हा प्रॉपवाला डान्स सध्या भलताच व्हायरल झाला आहे. रेस चित्रपटातील गाण्यावर 'ख्वॉब देखे छोटे मोटे' गाण्यावर या मुली डान्स करताना दिसत आहेत. खरे तर हा व्हडिओ युट्युबवर अपलोड करून अनेक दिवस झाले. पण, गेल्या काही काळात हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या भलतीच वाढली आहे. हे वृत्त लिहीपर्यंत सुमारे ९ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. आता त्यात नक्कीच वाढ झाली असेल. लिव्ह टू डान्स विथ सोनाली नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेर करण्यात आला आहे.

Read More