Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडकडे पाठ फिरवलेल्या 'दंगल गर्ल'चा पहिला फोटो पाहाल तर विश्वासचं बसणार नाही

पाहा आता कशी दिसते 'दंगल गर्ल' झायरा वसीम; फोटो व्हायरल

बॉलिवूडकडे पाठ फिरवलेल्या 'दंगल गर्ल'चा पहिला फोटो पाहाल तर विश्वासचं बसणार नाही

मुंबई : 'दंगल गर्ल' झायरा वसीम (Zaira Wasim)ला आपण सर्वचं ओळखतो. अभिनेत्रीने फार कमी वेळात कलाविश्वात आपले स्थान पक्क केलं. पण तिने झगमगत्या दुनियेचा निरोप घेत आध्यात्माचा मार्ग निवडला. झायरा कायम सोशल मीडिया ऍक्टिव्ह असते. पण जेव्हा तिने बॉलिवूडचा निरोप घेतला तेव्हापासून तिने सोशल मीडियावर एकही फोटो शेअर केला नाही. पण आता झायराने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये झायरा एका पूलावर फिरताना दिसत आहे. 

फोटोमध्ये झायराने तिचा चेहरा दाखवला नाही. तिने बुर्खा घातला आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'द वार्म ऑक्टोबर सन..' असं लिहीलं आहे. सायराच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 30 जून 2019 रोजी कलाविश्व सोडलेल्या झायराची झलक दोन वर्षांनंतर चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपल्या कारकिर्दीला पाच वर्षे पूर्ण होण्याच्याच दिवशी तिने बॉलिवूड सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवला.  'दंगल'मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आमिरसोबतच ती 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटातूनही झळकली होती. पण, आता मात्र तिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांनाच धक्का बसला आहे.

Read More