Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋषी कपूरच्या तब्बेतीबाबत मुलगी रिद्धिमाने दिली माहिती

काय आहे माहिती 

ऋषी कपूरच्या तब्बेतीबाबत मुलगी रिद्धिमाने दिली माहिती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर हे अमेरिकेत सध्या उपचार घेत आहे. तिथे जाऊन ऋषी कपूर यांना एक महिना झाला आहे. त्यांच्या तब्बेतीबाबत अनेक लोकं वेगवेगळी चर्चा करत आहे. अशावेळी ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिने आपल्या वडिलांच्या तब्बेतीबाबत सर्वात मोठी गोष्ट  सांगितली आहे. 

रिद्धिमा म्हणाली की, आता त्यांची तब्बेत ठिक आहे. कोणत्याही काळजीचं कारण नाही. रिद्धिमा कधीच आपल्या वडिलांच्या तब्बेतीबाबत चिंतेत नव्हती. ऋषी कपूर आपलं रूटीन टेस्ट करत आहेत आणि ते सगळे अपडेट ट्विटरवर शेअर करतच असतात. अनेक वर्षांनतर ऋषी कपूर आपलं रूटीन चेकअप करत आहेत त्यामुळे अशी आशा आहे की, आता सर्व ठीक आहे. 

अमेरिकेत ऋषी कपूर यांच्यासोबत पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर आहेत. ऋषी कपूर यांची आतापर्यंत अनेक कलाकारांनी भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देसी गर्ल प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, जावेद अख्तर, आलिया भट्ट आणि सोनाली बेंद्रे ऋषी कपूर यांना भेटायला गेले. सोनाली स्वतः अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत आहेत. 

Read More