Marathi News> मनोरंजन
Advertisement

Confirm : सलमान खानच्या 'या' सिनेमाचा रिमेक रद्द, हे आहे कारण?

अभिनेता वरूण धवनच्या जुडवा 2 या सिनेमाने धुमाकूळ घातला. 

Confirm : सलमान खानच्या 'या' सिनेमाचा रिमेक रद्द, हे आहे कारण?

मुंबई : अभिनेता वरूण धवनच्या जुडवा 2 या सिनेमाने धुमाकूळ घातला. 

या पाठोपाठ वरून धवन सलमान खानच्या बिवी नंबर 1 या सिनेमाचा रिमेक घेऊन येणार होता. सलमान खानचा हा सिनेमा 1999 रिलीज झाला होता. या सिनेमात सलमान खानने विवाहित पुरूषाचं काम केलं होतं. या सिनेमांत सलमानसोबत करिश्मा कपूर होती. करिश्माचा नवरा असलेल्या सलमान खानला एका मॉडेलशी प्रेम होतं. या सिनेमा कॉमेडी असून प्रेक्षकांनी त्याला अधिक पसंत केली. 

बिवी नंबर 1 च्या रिमेकबाबत डेविड धवनने अफवा असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की, ही एक अफवा असून बिवी नंबर 1 या सिनेमाचा रिमेक होत नाही आहे. मला आनंद आहे की प्रेक्षक माझ्या पुढील सिनेमाची इतक्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मला माहित आहे या सिनेमाचा रिमेक मला करणं अतिशय सोप्प आहे पण आम्ही ओरिजनल सिनेमा लवकरच घेऊन येत आहोत. 

सलमान खानच्या जागी वरूण धवन अभिनय करणार होता. प्रेक्षक वरूण धवनची अॅक्टिंग देखील पसंद करतात. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली जुडवा 2 ला प्रेक्षकांना अधिक पसंती मिळाली आहे. सिनेमातील त्याच्या अॅक्टिंगला अधिक पसंद केलं. या सिनेमात त्याने सलमान खान प्रमाणे डबल रोल केला होता. 

Read More