Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तारक मेहता'च्या दयाबेनने सोडला शो? हे आहे कारण..

‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी लवकरच कार्यक्रम सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

'तारक मेहता'च्या दयाबेनने सोडला शो? हे आहे कारण..

मुंबई : ‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी लवकरच कार्यक्रम सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

शो सोडला ? 

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या प्रेग्नेंसीनंतर ती शो सोडणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा लवकरत पुन्हा मालिकेत दिसेल .

पर्सनल लाईफमध्ये बिझी 

मेटरनिटी लीव कारणामुळे ती कित्येक महिने शोमधून शो मधून गायब आहे. तिने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये शेवटच शूट केलं होतं.  सध्या ती पर्सनल लाईफमध्ये बिझी असून मुलांसाठी वेळ देऊ इच्छिते. त्यामुळे दिशाची एन्ट्री कठीण वाटतेय. 

ही पात्रही नाहीत ? 

श्याम पाठक आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद झाल्याने श्यामला मालिकेपासून दूर ठेवण्याचा विचार सुरू आहे.

एका कार्यक्रमासाठी 'तारक ..' या मालिकेतील जेठा लाल म्हणजेच दिलीप जोशीला लंडनहून एका कार्यक्रमाचे मागणे आले होते.

जेठालाल आणि पोपटलाल यांच्यामधील धमालमस्ती तेथील रसिकांसमोर मांडण्यासाठी श्यामदेखील लंडनला पोहचले. मात्र या कार्यक्रमाची निर्मात्यांना माहिती न दिल्याने वाद झाला आहे.

लंडनहून परतल्यानंतर श्यामने निर्मात्यांची भेट घेतली.पण या भेटीत वाद झाल्याने श्यामला मालिकेपासून काही दिवस दूर ठेवले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. 

Read More