Marathi News> मनोरंजन
Advertisement

DDLJ 25 Years: काजोल-शाहरुखचा बेड सीन खूप कष्टाने शूट करण्यात आला होता, कारण गंमतीशीर आहे

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाच्या टीमने २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.

DDLJ 25 Years: काजोल-शाहरुखचा बेड सीन खूप कष्टाने शूट करण्यात आला होता, कारण गंमतीशीर आहे

मुंबई : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाच्या टीमने २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. यानिमित्ताने सिनेमाशी संबंधित बरेच मजेशीर किस्से इंटरनेटवर व्हायरल झाले होते. इतकंच नाही तर शाहरुख खानने आपलं ट्विटर नाव बदलून राज मल्होत्रा असं ठेवलं होतं आणि काजोलने सिमरन ठेवलं होतं. शाहरुख आणि काजोल खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांनीही खूप धमाल केली होती. एका मुलाखती दरम्यान काजोलने शूटिंग संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला.

fallbacks

रोमँटिक सीन चित्रित करणं कठीण होतं
शाहरुख खान आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील लव्ह स्टोरी हिट झाली. चित्रपटाची सगळी गाणी देखील हिट झाली आहेत आणि यातील सीनदेखील हिट झाले आहेत. सिनेमात शाहरूख आणि काजोलच्या बेडवरील एक सीन आहे. काजोलने या सीन संबधित फिल्मफेअरमध्ये एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. काजोल म्हणाली, ''आदित्य चोप्राला हा सीन थोडा हॉट बनवायचा होता, हा सीन चित्रित करण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागले.''

बेड सीन अनेक रीटेकनंतर शूट करण्यात आला
काजोलने म्हटलं होतं की, जेव्हा ती या सीनचं शूटिंग करत होती, तेव्हा ती आणि शाहरुख हसत होते. या सीनसाठी त्यांना बरेच रीटेक द्यावे लागले. शाहरुख डायलॉग बोलू लागला की ते एकमेकांकडे बघून हसू लागायचे. चित्रपटाचा सीन शूट करायला जरी अवघड गेलं असेल, तरी त्यातील अनेक सीन पाहून लोकांचे हार्टबीट्स आजही वाढतात.

Read More