Marathi News> मनोरंजन
Advertisement

...अन् हॉलिवूड स्टार पत्नीसमोरच ऐश्वर्या रायशी फ्लर्ट करू लागला; समोर आला 13 वर्षांपूर्वीचा 'तो' VIDEO

Hugh Jackman Flirted With Aishwarya Rai :  ह्यु जॅकमन पत्नीसमोर करत होता ऐश्वर्या रायशी फ्लर्ट... 'तो' व्हिडीओ आला समोर

...अन् हॉलिवूड स्टार पत्नीसमोरच ऐश्वर्या रायशी फ्लर्ट करू लागला; समोर आला 13 वर्षांपूर्वीचा 'तो' VIDEO

Hugh Jackman Flirted With Aishwarya Rai : हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमन गेल्या काही दिवसांपासून 'डेडपूल अॅन्ड वॉल्वरिन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीये जेव्हा ह्यू जॅकमन जेव्हा भारतात आला होता तेव्हा पत्नी समोरचं ऐश्वर्या रायशी फ्लर्ट करु लागला होता. त्याच्या एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडीओत दिसून येतंय की ह्यू जॅकमन देखील ऐश्वर्याची सुंदरता पाहता स्वत: ला थांबवू शकला नव्हता आणि तिच्याशी फ्लर्ट करु लागला. 

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो 'डेडपूल अॅन्ड वॉल्वरिन' 2011 चा आहे. तेव्हा ह्यू जॅकमन हा त्याच्या पत्नीसोबत भारतात आला होता. त्यावेळी ऐश्वर्याकडून सन्मानित करण्यात आल्यानंतर ह्यू जॅकमन हा तिच्यासोबत पत्नीसमोरचं फ्लर्ट करताना दिसत आहे. त्यावेळी त्याची पत्नी Deborra-Lee Furness तिथे उपस्थित होती. दरम्यान, त्या दोघांचा आता घटस्फोट झाला आहे. ह्यू जॅकमनला त्यावेळी ऐश्वर्या आणि दिवंगत फिल्ममेकर यश चोप्रा यांनी गणपती देवाची मूर्ती दिली होती. मूर्ती स्विकारल्यानंतर ह्यू जॅकमन म्हणाला की 'ऐश थॅंक्यू, मला सांगण्यात आलं होतं की माझी जगातील सगळ्यात सुंदर अभिनेत्रीशी भेट घालून देणार आहेत. त्यावेळी मला वाटलं की ती माझी पत्नी असेल. खरंतर मी हे यामुळे बोलतोय की मी खूप हुशार व्यक्ती आहे आणि त्यामुळे देखील की माझी पत्नी ही पहिल्या लाइनमध्ये बसली आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे ह्यू जॅकमन म्हणाला की 'पण ऐश, तुझे खरंच खूप खूप आभार. तू खरंच खूप सुंदर अभिनेत्री आहे. सगळ्यात सुंदर अभिनेत्री नाही ( यावेळी त्यानं त्याच्या पत्नीकडे इशारा केला) पण खरंच एक सुंदर अभिनेत्री आहेस. आम्हाला इथे बोलावण्यासाठी फिक्कीचे आभार. इथे मुंबई, इंडियात असणं आमच्यासाठी स्वप्नचं आहे. आम्ही इथे येण्यासाठी उत्सुक होतो.'

हेही वाचा : अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन, ऐश्वर्याच्या नावावर... मात्र आजही अपूर्ण...

ह्यू जॅकमॅननं तेव्हा अवॉर्ड शोमध्ये शाहरूख खान आणि विद्या बालनसोबत डान्स केला होता. ऐश्वर्याविषयी बोलायचं झालं तर ती जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे जेव्हा किम कर्दाशियन ही अनंत अंबांनी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नासाठी आली होती तेव्हा ती ऐश्वर्याला भेटली होती. तिनं ऐश्वर्याला क्वीन देखील म्हटलं. 

Read More