Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका पदुकोणच्या बहिणीकडून खास घोषणा

पाहा काय आहे हे 

दीपिका पदुकोणच्या बहिणीकडून खास घोषणा

मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार जोडी दीपिका पदुकोणा आणि रणवीर सिंह आज कोकणी पद्धतीने लग्न करत आहे. दीपवीरचे चाहते त्यांच्या या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी आतुर आहेत. पण दीपवीरच्या लग्नात सिक्युरिटी असल्यामुळे कोणत्याही विधीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. असं असताना दीपिकाच्या बहिणीने सोशल मीडियावरील एक स्टाईलचा वापर केला आहे. 

दीपिकाची लहान बहिण अनीषाने आपल्या ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं आहे. तिने हे नाव #Ladkiwale असं ठेवलं आहे. दीपिका पदुकोणच्या फॅनपेजमध्ये लडकीवाले हॅशटॅग काही वेळेपासून ट्रेंड होत आहे. आता दीपिकाच्या बहिणीने देखील हा हॅशटॅग वापरून आपलं टायटल बदललं आहे. 

fallbacks

लग्नाच्या अगोदर एक दिवस अगोदर साखरपुडा आणि मेहंदीच्या विधी करून घेतल्या. या विधीपण इटलीके लेक कोमोमध्ये झाली. संगीतच्या कार्यक्रमात बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने परफॉर्म केला आहे. हर्षदीपने आपला फोटो शेअर केला आहे. 'दीप-वीर' काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांसह इटलीत दाखल झाले. पण, त्यानंतर त्यांचा कोणताच नवा फोटो मात्र सोशल मीडियावर आला नाही. आपल्या विवाहसोहळ्याविषयी या दोघांनीही बरीच गोपनियता पाळली असून, त्यासाठी त्यांनी पाहुणे मंडळींचं सहकार्यही घेतलं आहे. 

Read More