Marathi News> मनोरंजन
Advertisement

पद्मावतच्या रिलीजवर बोलली दीपिका पदुकोण

अनेक दिवसापासून वादात सापडलेला सिनेमा 'पद्मावत' आज रिलीज होणार आहे.

पद्मावतच्या रिलीजवर बोलली दीपिका पदुकोण

मुंबई : अनेक दिवसापासून वादात सापडलेला सिनेमा 'पद्मावत' आज रिलीज होणार आहे.

पद्मावत सिनेमाच्या रिलीजवर दीपिका पदुकोणने म्हटलं आहे की, 'सिनेमाच्या रिलीजबाबत खूप उत्साहित आहे. आमच्यासाठी हा खास दिवस आहे की सिनेमा आज रिलीज होतोय. हा खूपच इमोशनल क्षण आहे.'

दीपिका पदुकोणने पुढे म्हटलं की, 'मी बॉक्स ऑफीसचा विचार नाही करत. पण या सिनेमासाठी बॉक्स ऑफीसचा विचार करते आहे.'

तब्बल ८००० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये २०० कोटींचा पल्ला हा सिनेमा गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या हिसंक आंदोलनानंतर मुंबईसह महाराष्ट्रातल्या बहुतांश चित्रपटगृहांना छावणीचं रुप आलंय.

सिनेमाला करणीसेनेचा विरोध कायम असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून थिएटरबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read More