Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका पादुकोणच्या लग्नाचे आमंत्रण 'या' अभिनेत्रीला नाही !

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' चित्रपटामुळे खूपच आनंदामध्ये आहे.

दीपिका पादुकोणच्या लग्नाचे आमंत्रण 'या' अभिनेत्रीला  नाही !

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' चित्रपटामुळे खूपच आनंदामध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिका आनी तिची बहीण अनीषा पादुकोण ' वोग BFF'  कार्यक्रमामध्ये साह्भागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये दीपिकाने अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.  

लग्नाच्या प्रश्नावर खास उत्तर  

नेहा धुपिया  ' वोग BFF'  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. कार्यक्रमामध्ये नेहाने दीपिकाला तिच्या लग्नाबद्दल खास प्रश्न विचारला. लाग्नात तू कॅटरीना कैफला आमंत्रण देणार का ? असा प्रश्न नेहाने विचारला होता. त्यावर दीपिकाने 'नाही' असे उत्तर दिले आहे. 

दीपिका, कॅटरीना आणि रणबीर  

दीपिका आणि कॅटरीना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असल्या तरीही त्यांच्यामधील मतभेदाचं कारण प्रोफेशनल नसून पर्सनल लाईफशी निगडीत आहे. 

कॅटरिनापूर्वी रणबीर आणि दीपिका एकमेकांना डेट करत होते. 20111 मध्ये एका मुलाखतीमध्ये कॅटरिनाने दीपिकाला धोका दिल्याचे सांगितले होते. सध्या दीपिका आणि रणबीर पुन्हा एकमेकांशी बोलतात. परंतू दीपिका अजूनही कॅटरिनाला माफ करू शकला नाही.  

'पद्मावत'चे यश 

अनेक वाद विवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आहे. यामध्ये शाहीद,रणबीर सोबत दीपिका प्रमुख भूमिकेत आहे. त्या दोघांच्या तुलनेत दीपिकाला अधिक मानधन मिळाले आहे. लॉन्ग विकेंडचा फायदा घेत 'पद्मावत' या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला कमावला आहे.  

लवकरच दीपिका विशाल भारद्वाजच्या 'सपना दीदी' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिकासोबत इरफान खान झळकणार आहे.  

Read More