Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी कुणाला घाबरत नाही!', दीपिका पादुकोणनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'कॉफी विथ करण 8' च्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. 

'मी कुणाला घाबरत नाही!', दीपिका पादुकोणनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेश्नल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या काही दिवसांपासून दीपिका तिच्या खासगी आयुष्यामुळे सगळ्यात जास्त चर्चेत आहे. दीपिकानं तिच्या खासगी आयुष्यातील काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. आता दीपिकानं या ट्रोलिंगवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाचं म्हणणं आहे की कोणासमोर तुची चूक मान्य करण्यास घाबरत नाही. 

दीपिकानं नुकतीच एका मॅग्झीनसाठी फोटोशूट केलं. ज्यात तिनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये केलेल्या तिच्या पास्ट रिलेशनशिपवर खुलासे केले आहे. त्यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. दीपिकाचं म्हणणं आहे की जेव्हा पण ती कोणत्याही गोष्टीविषयी खरंच पॅशननं विचार करते तेव्हा ती स्वत: तिच्या भावना व्यक्त करताना कोणताही विचार करत नाही. ती आता अशी व्यक्ती झाली आहे की जिथे ती सत्य बोलण्यापासून किंवा तिची चूक मान्य करण्यास घाबरत नाही.'

याशिवाय दीपिका म्हणाली की तिला माफी मागायला भिती नाही वाटक आणि तिला या गोष्टीचं देखील काहीच वाटत नाही की तिचे विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत. दरम्यान, दीपिका आणि रणवीर या दोघांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दीपिकानं तिच्या पास्ट रिलेशनशिपविषयी अनेक खुलासे केले. त्यानंतर ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. 

हेही वाचा : 'आंबट खाण्याची इच्छा होतेय!' Bigg Boss मध्ये अंकिता लोखंडेनं केली प्रेग्नंसी टेस्ट

दीपिकाच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ती लवकर 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशन सोबत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. खरंतर हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय वर्ल्डमधील एक आहे. या सीरिजमध्ये हा पाचवा चित्रपट आहे. या आधी दीपिका 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटात ती दिसली होती. 'पठाण' हा चित्रपट स्पाय वर्ल्डमधील एक आहे. 

Read More