Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझ लग्न झालं आहे, मर्यादेत राहा...', कोणाला खडसावून म्हणाली दीपिका पादुकोण?

'माझ लग्न झालं आहे, मर्यादेत राहा...', सर्वांसमोर भडकली दीपिका ! Video Viral   

'माझ लग्न झालं आहे, मर्यादेत राहा...', कोणाला खडसावून म्हणाली दीपिका पादुकोण?

मुंबई : ब्यूटी विथ ब्रेन... या वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone). अभिनय, सौंदर्य , बुद्धीमत्ता इत्यादी गोष्टींमुळे दीपिका कायम चर्चेत असते. दीपिकाने हातात माईक धरल्यावर ती तिच्या उत्तरांनी सर्वांना गप्प करते. दीपिका पदुकोण सध्या पती रणवीर सिंगसोबत अमेरिकेत आहे. सोशल मीडियावर दीपिका-रणवीरचे अमेरिकेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दीपिकाने आपल्या उत्तराने सर्वांना थक्क केलं आहे. दीपिका आणि रणवीर यांनी सॅन जोस, कॅलिफोर्निया येथील कोंकणी संमेलनात हजेरी लावली होती.  यादरम्यान दीपिका पूर्णपणे देसी लूकमध्ये दिसली, तिला पाहून तिच्या चाहत्यांची तारांबळ उडाली.

दीपिका दिसल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्री चाहत्यांनी 'We love you' असं म्हटलं. यावर दीपिका म्हणाली, 'माझ लग्न झालं आहे, मर्यादेत राहा...' असं दीपिका रागात नाही, गंमतीत म्हटली आहे. 

सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस आलेली दीपिका सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. 

 

Read More