Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाने व्हिडीओ शेअर करत सांगितली मुलीची खास सवय, पाहा व्हिडीओ

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नावं दुआ ठेवले आहे. त्यानंतर दीपिकाने मुलीचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या खास सवयी सांगितल्या आहेत.

दीपिकाने व्हिडीओ शेअर करत सांगितली मुलीची खास सवय, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या मुलीचे नाव दुआ ठेवले आहे. त्यानंतर मुलीच्या नावसह पहिला फोटो शेअर केला होता. फोटो समोर येताच चाहत्यांचे मन आनंदाने भरून गेले होते. दिवाळीच्या अवघ्या एक दिवसानंतर दीपिकाने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या काही सवयींबद्दल सांगितले आहे. दुआसोबत तिचा दिवस कसा जातो हे अभिनेत्रीने सांगितले. 

दीपिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय? 

काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण हिने एका मुलीला जन्म दिला आहे. नुकतेच दीपिकाने मुलीचे नाव दुआ ठेवले आहे. अशातच अभिनेत्रीने मुलीचा एक खास व्हिडीओ शेअर करून तिच्या सवयींबद्दल सांगितले आहे. त्यासोबत दीपिकाने मुलीची दिवसभराची दिनचर्या सांगितली आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, नवजात मुले असे काही करतात की त्यामुळे तुमचे ह्रदय प्रेमाने भरते. 

दिवसभर आईचे बोट धरून राहते

दीपिका पदुकोण हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची मुलगी दुआ ही दिवसभर तिचे बोट धरून राहते असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तोंड उघडे ठेवून मस्त झोप काढते. तसेच झोपेतून उठल्यानंतर हात लांब करून गोड मिठी मारते. 

fallbacks

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने हा व्हिडीओ शेअर करताच तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. दीपिकाने आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी काही दिवस इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला आहे. सध्या दीपिका तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांनंतर दीपिका पदुकोण पुन्हा एकदा कामावर परतणार आहे.

दीपिकाच्या मुलीच्या नावाचा अर्थ 

दीपिका आणि रणबीरने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा करून चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. त्यांनी त्याच्या मुलीचे नाव दुआ पदुकोण सिंग असं ठेवलं आहे. दुआ म्हणजे प्रार्थना. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा 'सिंघम अगेन' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

Read More