Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका लग्नाला घालणार तब्बल 5 कोटींचा लेहेंगा

बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीराव रणवीर सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायत..

दीपिका लग्नाला घालणार तब्बल 5 कोटींचा लेहेंगा

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीराव रणवीर सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायत..आता या शाही विवाह सोहळ्यासाठी दीपिका तब्बल 5 कोटींचा लेहेंगा परिधान करणार असल्याचं म्हंटलं जातयं..दीपिकाच्या ज्वेलरीपासून  ते आऊटफिट पर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा सातत्याने रंगतेयं..

दीपिकाने आपल्या लग्नासाठी आतापासूनच फेमस फॅशन डिझायनर सब्यसाचीला सुंदर लेहंगा बनवण्याची ऑर्डर दिलीये..दीपिकाचा सब्यसाचीवर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच तिने यासाठी त्याची निवड केलीये. सब्यसाचीने डिझाईन केलेल्या साड्याच दीपिका नेहमीच वापरते..

लग्नासाठीचा दीपिकाचा हा  लेहंगा जवळपास 26 जण मिळून तयार करणारेत..याहीपेक्षा खास गोष्ट म्हणजे दीपिकाचा लेहेंगा 5 कोटींचा असणार आहे...ऐकून धक्का बसला ना तुम्हाला ..तर दीपिकाचा हा लग्नसोहळा ख-या अर्थाने शाही असणार आहे..या सोहळ्यासाठीची दीपिकाची तयारी तरी सगळीच झालीये फक्त लग्नाची तारीखचं अजून ठरायची बाकीये..त्यामुळे दीपिका-रणवीरचं लग्न कधी होणार याकडे त्यांच्या चाहत्याचं लक्ष लागलयं..

Read More