Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाची गाजलेली अफेअर्स...

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोण हीचा आज वाढदिवस. 

दीपिकाची गाजलेली अफेअर्स...

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोण हीचा आज वाढदिवस. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या दीपिकाने अल्पावधीतच खूप नाव कमावले. ती आता १०० कोटी क्लबची क्वीन झाली आहे. सध्या तिच्या आणि अभिनेता रणवीर सिंगच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत असल्या तरी त्यापूर्वी तिची अफेअर्स खूप गाजली. जाणून घेऊया त्याविषयी...

निहार पंड्या

हे दीपिकाचे पहीले प्रेम म्हणावे लागेल. दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा होती. दीपिकाच्या स्ट्गलिंगच्या काळात हे अफेअर होते. पण तीन वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

fallbacks

उमेन पटेल

निहारनंतर दीपिकाचे नाव उमेनशी जोडले गेले. पण याचदरम्यान तिच्या आयुष्यात नवा तरूण आल्याने दोघांचे सुत फार काळ टिकले नाही.

fallbacks

 

युवराज सिंग

या तरूणामुळे उमेन दीपिकाच्या आयुष्यातून गायब झाला. अनेकदा युवराज-दीपिका एकत्र फिरताना दिसले होते. युवराजपूर्वी दीपिकाच्या आयुष्यात धोनी होता, असे म्हटले जाते. पण युवराजच्या एन्ट्रीने तो बाद झाला. पण दीपिका-युवराजचे अफेअर देखील फार काळ टिकले नाही.

fallbacks

 

सिद्धार्थ माल्या

युवराजनंतर विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबत दीपिकाचे अफेअर होते. बरीच वर्षे हे अफेअर चालले. प्रेमात पूर्ती बुडालेल्या दीपिकाचे हे रिलेशनशीपही टिकू शकले नाही.

fallbacks

रणबीर कपूर

त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरची एन्ट्री झाली. एकत्र काम केल्यानंतर दोघांचे प्रेम बहरले. पण त्यानंतर रणबीर कतरिना कैफमध्ये गुंतला आणि दीपिका-रणबीरच्या नात्याला पूर्णविराम लागला. 

fallbacks

रणवीर सिंग

रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर दीपिका डीप्रेशनमध्ये गेली. निराश झालेल्या दीपिकाला रणबीरचा आधार मिळाला आणि त्यानंतर दोघांचे प्रेम बहरले. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतरही दोघे एकत्र दिसले. आता तर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

fallbacks

Read More