Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' अभिनेत्याच्या लहानपणीच्या फोटोवर दीपिकाची चमत्कारिक प्रतिक्रिया

 दीपिकाच्या प्रतिक्रियेनं मात्र त्यांच्या चाहत्यांना खळखळून हसायला भाग पाडलं

'या' अभिनेत्याच्या लहानपणीच्या फोटोवर दीपिकाची चमत्कारिक प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या विवाहाची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. दोघांनीही या चर्चांवर चुप्पी साधून आपल्या फॅन्सची उत्सुकता आणखीनच ताणून धरलीय. पण, सोशल मीडियावर दोघं मात्र एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

नुकतंच, रणवीरनं आपला एक लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला... पण, यावर दीपिकाच्या प्रतिक्रियेनं मात्र त्यांच्या चाहत्यांना खळखळून हसायला भाग पाडलं. 

Avant Garde Since 1985

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिकाला रणवीरचा हा फोटो अजिबात आवडलेला दिसत नाहीय... पण, रणवीर मात्र आता जसा (विचित्र) ट्रेन्डी आहे... तसाच लहानपणीही होता, असंच त्याच्या या फोटोवरून लक्षात येतंय. 

fallbacks
दीपिकाची प्रतिक्रिया

रणवीरच्या या फोटोवर बॉलिवूडमधील त्याच्या आणखी काही मित्र-मैत्रिणींनीदेखील प्रतिक्रिया दिलीय... मात्र, दीपिकाची प्रतिक्रिया भाव खाऊन जातेय.... ते का हेही तुम्हाला कळलंच असेल. 

 

Read More