Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपवीरचा वेडींग लूक व्हायरल...

या वर्षाच्या सुरूवातीपासूनच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

दीपवीरचा वेडींग लूक व्हायरल...

नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरूवातीपासूनच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दीपिका पदुकोणच्या बर्थडेदिवशी ही जोडी साखरपूडा करणार असल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर या दोघांच्या पालकांची  भेट झाल्याचेही समोर आले होते. पण आता या सगळ्या बातम्या तुम्हाला जून्या वाटतील कारण या दोघांच्या लग्नाचा लूक समोर आले आहे. दीपवीरच्या एका चाहत्याने हा वेडींग लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यात दीपिका-रणवीर भारतीय वेशात दिसत आहेत. पहा त्यांचे फोटोज...

हे फोटोज सिड गॅलरी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या अकाऊंटच्या डिस्क्रिप्‍शनमध्ये याचे नाव सिद्धांत लिहिण्यात आले आहे. सिद्धांतला पेंटिंग आणि एडीटिंगची खूप आवड आहे. त्याच्या या आवडीचा हा उत्तम नमूना...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका-रणवीर विवाहबंधनात अडकण्याचा विचार करत आहेत. 

सध्या रणवीर सिंग गली बॉय या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर तो रोहीत शेट्टीच्या गली बॉयमध्येही झळकेल.

Read More