Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनेक वर्षांनंतर Jacqueline Fernandez चं 'हे' रहस्य येणार समोर, चाहत्यांना बसणार धक्का?

ज्याच्याकडून अभिनेत्रीने घेतले महागडे गिफ्ट्स, त्याच्याकडेच अभिनेत्रीने फिरवली पाठ? 200 कोटी खंडणी प्रकरणी ही व्यक्ती करणार खुलासा  

अनेक वर्षांनंतर Jacqueline Fernandez चं 'हे' रहस्य येणार समोर, चाहत्यांना बसणार धक्का?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर, यासाठी अभिनेत्री कोर्टाच्या पायऱ्या देखील चढली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पुन्हा एकदा जॅकलिनला चौकशीसाठी बोलावलं आहे. आज (सोमवारी) आर्थिक गुन्हे शाखेकडून  जॅकलिनची चौकशी होणार आहे.

फॅशन डिझायनर लिपाक्षी जॅकलिनचे रहस्य करणार उघड (Fashion Designer Leepakshi)
EOW ने फॅशन डिझायनर लिपाक्षीसह जॅकलीन फर्नांडिसला देखील बोलावलं आहे. EOW जॅकलिन आणि लिपाक्षी यांची समोरासमोर चौकशी करू शकते. यापूर्वी EOW टीमने जॅकलिनची 8 तास चौकशी केली होती. त्यामुळे आता अभिनेत्री संबंधी नवीन काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार,  सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) फॅशन डिझायनर लिपाक्षीला जॅकलिन फर्नांडिसचा ड्रेस डिझाईन करण्यासाठी पैसे दिले होते. शिवाय महाठग सुकेशने लिपाक्षीच्या माध्यमातून जॅकलिनला हा ड्रेस गिफ्ट केला होता. अशी माहिती समोर येत आहे. 

200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुरुवातीला जॅकलिनचं नाव समोर नव्हतं, तोपर्यंत अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होती. पण जेव्हा तिचं नाव समोर आलं तेव्हा जॅकलिनने चौकशी दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर फिरवून दिली. त्यामुळे जॅकलिनला आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

 

 

Read More