Marathi News> मनोरंजन
Advertisement

Cannes Festival: अमृता फडणवीस यांच्या लुक्सची एकच चर्चा, कान्स फेस्टिव्हलमधले फोटो आले समोर

अमृता फडणवीस यांचे कान्स फेस्टिव्हलमधले फोटो समोर आले आहेत.

Cannes Festival: अमृता फडणवीस यांच्या लुक्सची एकच चर्चा, कान्स फेस्टिव्हलमधले फोटो आले समोर

मुंबई : बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी कान्स फेस्टिव्हलमधल्या लुक्सची चर्चा असताना आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या लुक्सची चर्चा सुरु झालीय. अमृता फडणवीस यांचे कान्स फेस्टिव्हलमधले फोटो समोर आले आहेत.

fallbacks

अमृता फडणवीस यांचा कान्स फेस्टीव्हलमधला रेड कार्पेटवरचा पहिला लुक समोर आला आहे. या फोटोंमध्ये अमृता यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा करड्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.

fallbacks

अमृता फडणवीस यांनी कान्स फेस्टिव्हलबाबत एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.  

fallbacks
 
अन्न, आरोग्य आणि शाश्वत (विकास) या विषयांसंदर्भातील जनजागृतीसाठी त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम बेटर वर्ल्ड फाउण्डेशनने आयोजित केला होता, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेय.  

fallbacks

अमृता फडणवीस यांनी कान्स फेस्टिव्हलमध्ये पोहोचल्यानंतर 21 मे रोजी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली होती. 

fallbacks

अमृता फडणवीस यांच्या फोटोची एकचं चर्चा रंगली आहे. 

Read More