Marathi News> मनोरंजन
Advertisement

'देवमाणूस' मधील इन्स्पेक्टर दिव्याचा हटके हॉट डान्स व्हायरल : VIDEO

सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ 

'देवमाणूस' मधील इन्स्पेक्टर दिव्याचा हटके हॉट डान्स व्हायरल : VIDEO

मुंबई : झी मराठीवरील 'देवमाणूस' (Devmanus)  ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. मालिकेत नव्याने एन्ट्री झालेले पात्र म्हणजे इन्स्पेक्टर दिव्या (Inspector Divya) म्हणजे अभिनेत्री नेहा खानचं. (Neha Khan) नेहाने देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळेपण जपलं आहे. असं असताना आता दिव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दिव्या म्हणजे नेहा खानचे असंख्य चाहते आहेत. दिव्याच्या या व्हिडिओ खूप छान कमाल पाहायला मिळत आहे. नेहा खानने या व्हिडिओ एक सूट घातला आहे. निळ्या रंगाचा टॉप असून सफेद रंगाची ओढणी आणि लेगीन्स घालून चाहत्यांना खास अंदाज दाखवला आहे. 

या व्हिडिओत ती 'हटजा सामने से तेरे भैया खडे है...' या गाण्यावर परफॉर्मन्स करत आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. अनेक प्रतिक्रिया यावर येत आहेत. 

मालिकेतील गाजत असलेलं पात्र म्हणजेच मंजुळा मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर नेहा खानने मालिकेत एन्ट्री घेतली आहे. नेहा खान ही अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून हिंदी, मराठी सृष्टीत ओळखली जाते. ती मूळची अमरावतीची आहे. आठव्या वर्गात शिकत असताना तिनं मॉडेलिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला होता.

नेहा खानने 'शिकारी' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. या सिनेमात तिची अतिशय बोल्ड भूमिका आहे. या सिनेमातील तिच्या बोल्ड लूकला चांगलाच प्रतिसाद मिळाल्यामुळे ती चर्चेत आली. 

Read More