Marathi News> मनोरंजन
Advertisement

देवोलिना भट्टाचार्जीनं पती शाहनवाजसोबत पाहिला The Kerala Story! म्हणाली 'तो मुस्लिम असूनही त्याला त्यात...'

Devoleena Bhattacharjee on The Kerala Story : देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पतीसोबत द केरला स्टोरी पाहून आल्यानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती ते सांगितलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

देवोलिना भट्टाचार्जीनं पती शाहनवाजसोबत पाहिला The Kerala Story! म्हणाली 'तो मुस्लिम असूनही त्याला त्यात...'

Devoleena Bhattacharjee on The Kerala Story : बॉलिवूडचा सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘द केरला स्टोरी’ आहे. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सगळ्यात आधी त्याच्या ट्रेलरमुळे आणि आता चित्रपट पाहिल्यानंतर त्यात दाखवण्यात आलेल्या काही सीन्समुळे. हा चित्रपट केरळमधील चार मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. कशा प्रकारे महिलांना धर्मांतरन करण्यासाठी भाग पाडतात आणि त्यानंतर दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील करतात. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणटलं होतं. त्यावर अनेक राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी बंदी घालण्याची मागणी केली. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं तिच्या पतीसोबत हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर तिच्या पतीची काय प्रतिक्रिया होती ते सांगितलं आहे. 

देवोलिनाच्या पतीचं नाव शाहनवाज शेख असं आहे. देवोलिना आणि शाहनवाज बराच वेळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले. शाहनवाज हा मुस्लिम आहे. त्याच्याशी लग्न केल्यानं देवोलिनाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता तिनं शाहनवाजसोबत ‘द केरला स्टोरी’ हा पाहिला असून त्यानंतर तिच्या पतीची त्यावर काय प्रतिक्रिया होती ते सांगितलं आहे. 

देवोलिनानं एक ट्वीट रिट्वीट करत तिच्या पतीसोबत आलेला तिचा अनुभव सांगितला आहे. एका ट्वीटमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत आलेला अनुभव सांगत होती की तिला कशा प्रकारे ‘द केरला स्टोरी’वरून तिच्या बॉयफ्रेंडनं खडे बोल सुनावले. हेच ट्वीट रिट्वीट करत देवोलिना म्हणाली, 'प्रत्येकवेळी असं होईल असं नाही. माझा पती मुस्लिम आहे. तो माझ्यासोबत हा चित्रपट पाहायला आला होता आणि त्याला चित्रपट आवडला. तो हा चित्रपट पाहून नाराज झाला नाही किंवा हा चित्रपट त्याच्या त्याच्या धर्माच्या विरोधात आहे असं वाटलं नाही. प्रत्येक भारतीयाने असं असलं पाहिजे असं मला वाटतं.' देवोलिनाचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. देवोलिनाचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

हेही वाचा : Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...'

देवोलिनाचा पती शाहनवाज हा आधी तिचा जीम ट्रेनर होता. त्यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं आहे, तर देवोलिनाला 2017 साली प्रदर्शित झालेल्या साथ निभाना साथिया या मालिकेतील गोपी बहूच्या भूमिकेसाठी ओळखतात.

Read More