Marathi News> मनोरंजन
Advertisement

Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!

Devoleena Bhattacharjee च्या भावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो नाराज असल्याचे म्हटले आहे. 

Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!

Devoleena Bhattacharjee's Brother Is not Happy Over Her Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर तिच्या भावाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यानं काहीही सांगितलेलं नाही. मात्र, त्यानं थोडक्यात देवोलीनाकडे इशारा केल्याचे म्हटले जात आहे. देवोलीनाचा भाऊ अनिदीप भट्टाचार्जीनं नातं तुटण्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Devoleena Bhattacharjee'sBrother Post)

पाहा काय म्हणाला देवोलीनाचा भाऊ -

देवोलीनानं तिच्या रिलेशनशिपला नावं दिलं आहे. आता देवोलीना मिसेस शहनवाज झाली आहे. देवोलीनानं कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांच्या लग्नात मुलगा आणि मुलगी दोघांच्या बाजूनं फारसे लोक दिसले नाहीत. देवोलीनाची आई त्यांच्यासोबत होती. आता तिच्या भावाची एक पोस्ट चर्चेत आहे. यात तिनं लिहिलं आहे की, जे लोक स्वत: चा विचार करतात त्यांना त्या क्षणी जे बरोबर वाटतं याची काळजी असते. त्यांना तेच करायचं असतंय. त्यांना इतरांच्या मान-सन्मानाशी काही देणेघेणे नसते. यानंतर त्यांचे नाते का तुटले याचे त्यांना आश्चर्य वाटते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan

fallbacks

देवोलीनानं आत्तापर्यंत कोणाला तिच्या रिलेशनशिपविषयी कळू दिले नव्हते. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (devoleena bhattacharjee s brother andeep writes cryptic post after her wedding) 

Read More