Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : देवोलीना भट्टाचार्जीसोबत शिक्षकाचं घाणेरडं कृत्य

टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आपल्या बिंधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. 

धक्कादायक : देवोलीना भट्टाचार्जीसोबत शिक्षकाचं घाणेरडं कृत्य

मुंबई : टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आपल्या बिंधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. देवोलीना प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडते. टीव्ही एक्ट्रेस देवोलीना अनेकदा आपल्या बिंधास्त अंदाजामुळे फेममध्ये आली आहे. यावेळी देवोलीनाने आपल्या लहानपणीचा वाईट अनुभव शेअर केला आहे. जो जाणून घेतल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. देवोलीनाने लेडीज वर्सेज जेंटलमैन 2 मध्ये सांगितलं की,  तिच्यासोबत लहानपणी एक वाईट कृत्य घडलं होतं.

लेडीज Vs जेंटलमन सीझन 2 चा प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देवोलिना सांगताना दिसतेय की, तिचे गणिताचे शिक्षिक खूप चांगलं शिकवायचे. तिथे सगळे विद्यार्थी शिकवणीसाठी येत असत. तिचे दोन चांगले मैत्रिणीही त्या क्लासला जायचे पण अचानक त्यांनी जाणं बंद केलं. देवोलिना व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, तिने असं का केलं हे तिला समजलं नाही.

देव्होलिना भट्टाचार्जीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, जेव्हा मी आठवडाभरानंतर ट्यूशनला जाऊ लागले तेव्हा टिचरने तिच्यासोबत घाणेरडं काम केलं. घरी गेल्यावर तिने आईलाही हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जाऊन शिक्षकाच्या पत्नीकडे तक्रार केली. देवोलिना व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे की, तिला शिक्षकावर कठोर कारवाई करायची होती कारण तिने माझ्यासोबत नाही तर माझ्या दोन मैत्रिणीसोबतही असंच केलं होतं. त्यामुळेच त्यांनी ट्यूशनला जाणं बंद केलं.

देवोलिना शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं नाही की, त्यांनी तिथं जाणं का थांबवलं, कदाचित त्यांना वाटलं असेल की, समाज काय म्हणेल. लोक काय म्हणतील, माझ्या घरच्यांचाही हाच विचार होता. त्यामुळेच त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. देवोलिना व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहे की, पण आज मला असं वाटतं की, आता मला स्वतःसाठी उभं राहून कारवाई करावी लागेल. समाजाला आणि पालकांनाही माझा सल्ला आहे की तुमच्या मुलांसोबत असं काही घडले तर कारवाई करा.

Read More