Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन

 'झी मराठी' वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता अर्थात छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) हिने चाहत्यांसाठी गोड बातमी दिली आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन

मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता अर्थात छोट्या पडद्यावरच्या वहिणीसाहेब अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. या वहिणीसाहेब आई झाल्या आहेत. धनश्री हिनेचे ही गोड बातमी सांगितली. तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. धनश्रीने गुरुवारी सकाळी मुलाला जन्म दिला. (baby boy)

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही महिन्यांपूर्वी एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेग्नंट असल्याची बातमी धनश्रीने दिली होती. कुणीतरी येणार येणार गं... पतीच्या बर्थडेच्या दिवशी धनश्रीने ही गोड बातमी समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यानंतर तिची अधिक चर्चा सुरु झाली होती.

 धनश्री काडगावकर हिने आपला आनंद शेअर करत एक फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. 'आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गुरुवारी सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे, असे तिने म्हटले आहे.

Read More